शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

गोव्यात सहकार क्षेत्रातही राजकीय घुसखोरी सरकारच्या अंगलट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 13:32 IST

गोव्यात सहकार क्षेत्रातही राजकीय घुसखोरी सरकारच्या अंगलट आली आहे. गोवा अर्बन सहकारी बँकेवर सरकारने वशिलेबाजीने संचालकपदी केलेली दोघांची नियुक्ती रद्द करणारा हायकोर्टाचा आदेश सर्वोच्च न्यायालयानेही उचलून धरला आहे.

पणजी : गोव्यात सहकार क्षेत्रातही राजकीय घुसखोरी सरकारच्या अंगलट आली आहे. गोवा अर्बन सहकारी बँकेवर सरकारने वशिलेबाजीने संचालकपदी केलेली दोघांची नियुक्ती रद्द करणारा हायकोर्टाचा आदेश सर्वोच्च न्यायालयानेही उचलून धरला आहे. यामुळे सरकारवर पुरती नामुष्की ओढवली आहे.  या बँकेवर सहकार निबंधकांनी राजकीय दबावाखाली येऊन भाजप माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांची पत्नी सोनिया तसेच प्रभू दुलो गावडे यांची संचालकपदी नियुक्ती केली होती. अन्य एक संचालक अनिल गावणेकर यांनी हे प्रकरण हायकोर्टात नेले होते. हायकोर्टाने गेल्या १ आॅगस्ट रोजी वरील दोघांची नियुक्ती अवैध ठरवून रद्द करण्याचा आदेश दिला. ही नियुक्ती एकतर्फी, लोकशाही मूल्यांच्या विरोधात, बँकेच्या हितापेक्षा बँकेवर सरकारी प्रभाव ठेवण्याच्या इराद्याने केलेली असल्याचे निरीक्षण नोंदवून सरकारची कडक शब्दात कान उघाडणी केली.

रिक्त जागा भरण्याची प्राथमिक जबाबदारी ही संचालक मंडळाची आहे. निबंधकाला तो अधिकार आहे, असे गृहीत धरून चाललो, तरी अपात्र सदस्यांची नेमणूक होऊ शकत नाही. अपवादात्मक परिस्थितीत अशा नियुक्त्या कराव्या लागल्याच, तरी त्यासाठी नोटीस जारी करण्यापासून जे सोपस्कार करावे लागतात ते करण्यात आले नाहीत, असे निवाड्यात म्हटले होते. घटनात्मक तरतुदींचा वापर हा सहकारी संस्थांनांचे नियंत्रण सरकाकडे सोपविण्यासाठी होऊ नये. दोन आठवड्यात सर्व पदांची नियुक्ती करण्याचा आदेशही खंडपिठाने दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळताना हा आदेश उचलून धरला आहे. 

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, ९ मे २0१७ रोजी झालेल्या गोवा अर्बन सहकारी बँकेच्या ११ सदस्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत गावणेकर पॅनलचे ५ संचालक जिंकून आले होते. चार संचालक गोविंद कामत यांच्या पॅनलचे जिंकले होते, तर दोन जागा रिक्त होत्या. त्यामुळे गावणेकर पॅनलचे निर्विवाद वर्चस्व असतानाही सरकारी हस्तक्षेपाने संचालकांची दोन पदे भरण्यात आली. 

दरम्यान, दुसरीकडे गोवा डेअरीच्या सात संचालकांना अपात्र ठरविण्याचा व डेअरीच्या व्यवस्थापकीय संचालकांना निलंबित करण्याचा सहकार निबंधकांचा निर्णयही वादाच्या भोव-यात सापडला आहे. ३१ आॅगस्ट रोजी काढलेल्या या आदेशावरुन सहकार क्षेत्रात नाराजी आहे.  सहकार क्षेत्रातील जाणकार, गोवा डेअरीचे माजी अध्यक्ष माधव सहकारी म्हणाले की, ‘ सरकारने खरे तर हस्तक्षेप करुच नये. काही वर्षांपूर्वी असाच हस्तक्षेप केला आणि काही गोष्टी बळावल्या. गैर गोष्टींना संरक्षण मिळू नये हेही तितकेच खरे.’

टॅग्स :Politicsराजकारणgoaगोवाbankबँक