शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मुख्यमंत्र्यांचे कुटुंब: जनसंघ ते भाजप प्रवास

By किशोर कुबल | Updated: April 6, 2025 12:50 IST

मुख्यमंत्री सावंत हे भाजपमध्ये त्यांची परंपरा चालवत आहेत.

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कुटुंब रा. स्व. संघाच्या विचारांचे आहे. त्यांचे वडील पांडुरंग हे जिल्हा पंचायत सदस्य होते. तेव्हाचा जनसंघ, विहिंप तसेच भारतीय मजदूर संघातही त्यांनी काम केले आहे. मुख्यमंत्री सावंत हे भाजपमध्ये त्यांची परंपरा चालवत आहेत.

१९८० साली भाजपची स्थापना झाली. त्यानंतर काशिनाथ परब हे प्रदेश भाजपचे पहिले अध्यक्ष बनले. विश्वनाथ आर्लेकर, माधव धोंड वगैरे त्यावेळी सक्रिय होते. १९८४ साली भाजपने गोव्यात पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. परंतु यश आले नाही. त्यानंतर श्रीपाद नाईक वगैरे भाजपात आले. १९८९ साली पक्षाने दुसऱ्यांदा निवडणूक लढवली.

डॉ. प्रमोद सावंत हे राजकारणात आले ते दिवंगत मनोहर पर्रीकरांमुळेच! सुमारे तीन दशके पर्रीकर यांचे गोवाभाजपावर एकहाती वर्चस्व होते. त्यांनी माणसे निवडली, मोठी केली. सावंत कुटुंबीय संघाशी संबंधित असल्याने पर्रीकर त्यांच्या घरी येत असत. प्रमोद सावंत हे तेव्हापासूनच त्यांच्या नजरेत होते. पूर्णवेळ राजकारणात सक्रिय होण्याअगोदर सावंत वैद्यकीय प्रॅक्टिससुद्धा करत होते. ते संघाच्या आणि त्यांच्या भागातल्या इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कार्यरत असायचे. भाजपामध्ये त्यांना तरुण वयात जबाबदाऱ्या मिळत गेल्या. ते गोव्यात भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अनेक काळ होते. त्यांना युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षही करण्यात आलेले. २००८ साली साखळी मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक होती, ती त्यांनी लढवली. या निवडणुकीत ते हरले; पण त्यांचं राजकारणातले करियर मात्र सुरू झाले.

आर्लेकरांचे भाजपशी नाते...

गोव्याचे सुपुत्र राजेंद्र आर्लेकर, जे सध्या केरळचे राज्यपाल आहेत. ते अशा कुटुंबातून आले आहेत, जे जनसंघाच्या काळापासून भाजपशी जवळून जोडलेले आहेत. आर्लेकर यांचे वडील स्वर्गीय विश्वनाथ हे दादा म्हणून ओळखले जात होते. वास्को आणि मुरगाव तालुक्यांत भाजपची पाळेमुळे मजबूत करण्यात आर्लेकर कुटुंबांचा मोठा वाटा आहे. आर्लेकर यांना त्यांच्या वडिलांकडून कडक शिस्तीचे धडे मिळाले. आर्लेकर खूप लहान वयातच संघाकडे आकर्षित झाले. लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी आणि मुरली मनोहर जोशी यांनी सुरू केलेल्या अयोध्या राम मंदिर चळवळीच्या दरम्यान राम रथयात्रेसह अनेक चळवळींमध्ये त्यांनी भाग घेतला होता. आर्लेकर हे त्यांच्या वडिलांना आणि इतर कट्टर जनसंघ सदस्यांना मदत करायचे.

भाजपचे आतापर्यंतचे प्रदेशाध्यक्ष

काशिनाथ परब : १९८० ते १९८९ : २ वर्षेविश्वनाथ आर्लेकर : १९८९ ते १९९१ : २ वर्षेश्रीपाद नाईक : १९९१ ते १९९५ : ४ वर्षेसुरेश आमोणकर : १९९५ ते २००० : ५ वर्षेलक्ष्मीकांत पार्सेकर : २००० ते २००३ : ३ वर्षेराजेंद्र आर्लेकर : २००३ ते २००७ : ४ वर्षेश्रीपाद नाईक : २००७ ते २०१० : ३ वर्षेलक्ष्मीकांत पार्सेकर: २०१० ते २०१२ : २ वर्षेविनय तेंडुलकर : २०१२ ते २०२० : ८ वर्षेसदानंद शेट तानावडे : २०२० ते २०२५ : ५ वर्षेदामू नाईक : १८ जानेवारी २०२५ पासून (विद्यमान)

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत