शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; मिराबाग आंदोलकांची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 07:34 IST

या प्रकल्पाबाबतच्या फाइलवर आपण तसे नोटिंग नमूद करू, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, कुडचडे/पणजी : 'मिराबागला बंधारा कदापि होणार नाही. यासंबंधीचे आश्वासन आंदोलकांच्या शिष्टमंडळाला मी यापूर्वी दिलेले आहे. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे,' असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवत मिराबाग येथील ग्रामस्थांनी सुमारे ४९ दिवसांचे आपले आंदोलन सोमवारी मागे घेतले. मिराबाग येथे बंधारा प्रकल्प होणार नाही. या प्रकल्पाबाबतच्या फाइलवर आपण तसे नोटिंग नमूद करू, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

याबाबत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'काही दिवसांपूर्वी मिराबागच्या लोकांचे शिष्टमंडळ मला भेटले. त्यांच्या अडचणी समजून घेऊन मी जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, स्थानिक आमदार तथा सभापती गणेश गांवकर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाला बंधारा होणार नाही असे स्पष्ट आश्वासन दिलेले आहे.'

मुख्यमंत्री म्हणाले की, 'गेले ४० ते ४५ दिवस विनाकारण आंदोलन चालले आहे. मागील भेटीत शिष्टमंडळाने माझ्यासमोर काही गोष्टी मांडल्या. मला त्यांच्या भावना समजल्या. याठिकाणी जॅकवेल किंवा कोणताही प्रकल्प करण्याचा सरकारचा विचार नाही. बंधारा होणार नाही, असे मी स्पष्टपणे याआधी सांगितलेले आहे. मी पूर्ण जबाबदारीने हे विधान केलेले आहे.' 

दरम्यान, पत्रकारांनी आंदोलक लेखी मागत आहेत, याबाबत विचारले असता सावंत म्हणाले की, 'मी लेखी का म्हणून द्यावे? मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर आंदोलकांचा विश्वास नाही का? आंदोलकांना माझी विनंती आहे की, त्यांनी रस्ते वगैरे अडवून आंदोलन करू नये. माझा शब्द हा लेखी लिहून दिल्यासारखाच आहे. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर तरी आंदोलकांनी विश्वास ठेवावा.'

पणजीत आझाद मैदान परिसरात जमावबंदी

दरम्यान, येथील आझाद मैदानावर मीराबाग-सावर्डे येथील बंधारा प्रकल्पाविरोधात तेथील ग्रामस्थांनी सोमवारपासून आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली. तर सरकारच्या या निर्णयाचा आंदोलनकर्त्यांनी तीव्र निषेध केला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी याबाबतचा आदेश लागू केला होता.

चर्चेनंतर घेतला निर्णय

दरम्यान, मीराबाग येथील स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांची मडगाव गेस्ट हाऊस येथे सोमवारी दुपारी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी हा लढा थांबविण्याचा निर्णय घेतला. या विजयानंतर संपूर्ण गावात जल्लोषाचे वातावरण आहे. आंदोलकांच्या त्यांच्या चारही मागण्या सरकारने तत्त्वतः मान्य केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वादग्रस्त प्रकल्प पूर्णपणे रद्द करणे आणि खाजन जमिनीशी संबंधित जुन्या मागण्यांची पूर्तता करणे या आश्वासनांचा समावेश आहे. सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे आंदोलकांनी आनंद व्यक्त केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : CM Assures, Mirabag Protest Ends: Dam Project Shelved After Assurance

Web Summary : After CM's assurance that the Mirabag dam project is cancelled, villagers withdrew their 49-day protest. The CM promised written confirmation and addressed protestors' concerns about the project and land issues, leading to celebrations in Mirabag.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत