शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

मुख्यमंत्र्यांकडून खाते वाटपासाठी शुक्रवारी बैठक; सात मंत्री दिल्लीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 9:09 PM

मनोहर पर्रिकर त्यांच्याकडे असणाऱ्या अतिरिक्त खात्यांचं वाटप करणार

पणजी : आपल्याकडील अतिरिक्त खाती मंत्र्यांमध्ये वितरित करण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे उद्या शुक्रवारी सात मंत्र्यांसोबत व भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. कुणाला कोणते खाते द्यावे तसेच अधिकारांचे वाटप कसे करावे याविषयी मुख्यमंत्री चर्चा करतील. यासाठी एकूण सात मंत्री गुरूवारी दिल्लीत दाखल झाले आहेत.मुख्यमंत्र्यांनी खाते वाटपाविषयी अगोदर प्रस्ताव द्यावा, जेणेकरून गोवा फॉरवर्डच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळतील हे कळेल, असे मंत्री विजय सरदेसाई यांनी अगोदर मुख्यमंत्र्यांना सुचवले होते. पण मुख्यमंत्र्यांनी आज शुक्रवारी सर्वाना थेट चर्चेसाठीच बोलावले आहे. भाजपाचे मंत्री माविन गुदिन्हो, निलेश काब्राल व विश्वजित राणे हे बैठकीत सहभागी होतील. नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांना मात्र बोलावलेले नाही. मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर व गोवा फॉरवर्डतर्फे मंत्री सरदेसाई सहभागी होतील. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर हे दिल्लीला जाणार नाहीत. त्यांना बैठकीचे निमंत्रण नाही. शिवाय ते त्यांच्या कौटुंबिक सोहळ्यात व्यस्त आहेत.भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व एक-दोन पदाधिकारी बैठकीत सहभागी होतील. दिल्लीतील एम्स इस्पितळात मुख्यमंत्री उपचार घेत असून तिथेच बैठक होईल. मुख्यमंत्री आपल्याकडील अर्थ व गृह खाती देणार नाहीत, पण अन्य महत्त्वाची खाती देतील. मात्र मनाजोगी खाती मिळाली नाही तर काय होईल, याचे संकेत काही मंत्र्यांसोबत बोलताना मिळतात. वन, पर्यावरण, खाण, सहकार, शिक्षण, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, नागरी उड्डाण अशी विविध खाती तसेच गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ, मोपा प्राधिकरण, कचरा व्यवस्थापन महामंडळ अशा सरकारी संस्थांची चेअरमनपदेही पर्रिकर यांच्याकडेच आहेत. खाते वाटप उद्याच होणार नाही. मंत्र्यांचे म्हणणो ऐकून मुख्यमंत्री मग स्वतंत्रपणे भाजपशी चर्चा करतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही खात्यांची यादी दाखवली जाईल. त्यानंतर निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाministerमंत्री