शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पीडीएविरोधकांच्या आंदोलनास दिशा देण्याचा पर्यावरणप्रेमी क्लॉड यांचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 14:02 IST

नव्या पीडीएला जनतेचा तीव्र विरोध

पणजी : बेकायदा खनिज खाणींविरुद्ध कायम लढत आलेले आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जात मुजोर खाण व्यावसायिकांना वठणीवर आणण्यात ऐतिहासिक भूमिका बजावणारे ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी डॉ. क्लॉड अल्वारीस यांनी आता पीडीएविरोधकांच्या आंदोलनास योग्य अशी दिशा देण्याचा प्रयत्न चालवला आहे. पीडीएविरोधी आंदोलकांना अल्वारीस हे सातत्याने मार्गदर्शन करू लागले आहेत.पर्रिकर सरकारने ग्रेटर पणजी ही नवी पीडीए स्थापन करताच राज्यात आंदोलन सुरू झाले. बाबूश मोन्सेरात यांच्याकडे या पीडीएचे चेअरमनपद सरकारने सोपवल्यानंतर सांताक्रुझ, सांतआंद्रेसह बार्देश आणि सासष्टी तालुक्यातूनही आंदोलनास धार चढण्यास सुरुवात झाली. लोकांच्या मागणीची दखल घेत आम्ही ग्रेटर पणजी पीडीएमधून सांताक्रुझ, सांतआंद्रेमधील सगळी गावे व बांबोळीचा पठारही वगळतो, अशी घोषणा नगर नियोजन खात्याने केली होती. पण या घोषणोची अंमलबजावणी झाली नाही. अधिकृतरित्या अजून ही गावे किंवा पठार पीडीएतून वगळण्यात आलेले नाहीत. येत्या 16 रोजी राज्य नियोजन मंडळाची बैठक होणार असून त्या बैठकीतून काही निर्णय अपेक्षित आहेत. पीडीएसह काही भागांमध्ये बाह्यविकास आराखड्यांनाही विकास होत आहे. बिल्डरांच्या हितासाठीच हे सगळे केले जात असल्याची भावना तिसवाडी, बार्देश व सासष्टीतील मतदारांमध्ये आहे.पीडीएविरोधी आंदोलक सध्या रोज पणजीतील आझाद मैदानावर जमतात आणि तिथे ते साखळी उपोषण करतात. त्यांची दखल घेणे सत्ताधारी भाजपानेही टाळले आहे. अशावेळी क्लॉड अल्वारीस यांनी पुढाकार घेत या आंदोलनाला बळ देत आंदोलनास योग्य ती दिशा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यापूर्वी आंदोलकांच्या सभेत अल्वारीस यांनी भाषण केले होते. आता ते आझाद मैदानावर येऊन छोटया बैठकांमध्ये आंदोलकांना कायद्याच्या दृष्टीकोनातूनही मार्गदर्शन करत आहेत. आंदोलन कसे टप्प्प्याटप्प्याने पुढे न्यायचे असते याची शिकवण अल्वारीस यांनी आंदोलकांना देण्याचा प्रयत्न चालवला आहे. अल्वारीस यांच्या तोडीचा एकही मार्गदर्शक अजूनपर्यंत पीडीएविरोधी आंदोलकांना मिळाला नव्हता. याच आंदोलकांना घेऊन अल्वारीस यांनी शनिवारी खाण खात्याच्या मुख्यालयावर मोर्चा नेला व मुख्य दरवाजाला टाळे ठोकले. पीडीएविरोधी आंदोलकांनी यावेळी सरकारविरुद्ध व खाण खात्याविरुद्ध जोरदार घोषणा दिल्या. आम्ही जिंकल्याशिवाय गप्प राहणार नाही, आमची गावे आम्हाला वाचवायची आहेत, आम्हाला काँक्रिटची जंगले नकोत तर हिरवागार गोवा सांभाळून ठेवायचा आहे, असे पीडीएविरोधी आंदोलकांनी पत्रकारांना सांगितले. 

टॅग्स :goaगोवा