शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

‘चिपी’ झाला, ‘मोपा’रखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 19:50 IST

गोव्यातील नियोजित मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ मात्र अनेक कारणांमुळे रखडला आहे. दोन्ही विमानतळांची घोषणा एकाचवेळी झाली होती परंतु ‘मोपा’ या ना त्या कारणावरुन रखडला. 

पणजी : शेजारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाने अखेर बाजी मारली. मात्र गोव्यातील नियोजित मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ मात्र अनेक कारणांमुळे रखडला आहे. दोन्ही विमानतळांची घोषणा एकाचवेळी झाली होती परंतु ‘मोपा’ या ना त्या कारणावरुन रखडला. 

सुरवातीपासूनच चर्च संस्थेशी संबंधित व्यक्तींचा ‘मोपा’ला विरोध राहिलेला आहे. दक्षिण गोव्यातून तर या प्रकल्पाला वाढता विरोध आहे. मध्यंतरी पर्यावरणीय परिणाम अभ्यास अहवाल तसेच वृक्षतोडीच्या प्रश्नावरुन प्रकरण राष्ट्रीय हरित लवाद तसेच हायकोर्टाकडे गेले आणि काम रखडले परंतु ४ महिन्यांपूर्वी याबाबतीत काहिसा दिलासा मिळाला असून प्रत्यक्षात यापुढेच कामाला गती येणार आहे. 

राज्य हवाई वाहतूक विभागाचे संचालक सुरेश शानबोगे यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘गेल्या वर्षी ४ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष काम सुरु झालेले असून ३६ महिन्यात म्हणजेच साधारणपणे डिसेंबर २0२0 पर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.’ हे काम वेळेत पूर्ण केले जाईल, असा दावा त्यांनी केला. दोन्ही विमानतळांचे नियोजन सर्वसाधारणपणे एकाच वेळी झाले होते. ‘मोपा’ मात्र मागे पडला. २२७१ एकर जमिनीत हा विमानतळ येणार आहे. या प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणाम अभ्यास अहवालास दिलेले आव्हान राष्ट्रीय हरित लवादाने फेटाळल्यानंतर या प्रकल्पाला मोठा दिलासा मिळालेला आहे. जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी या विमानळाचे बांधकाम करीत आहे. 

आम आदमी पक्षाचा असा दावा आहे की, या प्रकल्पासाठी प्रत्यक्षात ५४,६७६ झाडे कापावी लागणार आहेत आणि त्यासाठी वन खात्याचे अधिकारी कुलदीप शर्मा यांनी सह्याही केल्या आहेत. 

‘मोपा’च्या कामाला गती यावी यासाठी सरकारने गेल्या अधिवेशनात विधेयक संमत करुन खास पीडीए स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला. या प्रकल्पासाठी आता पूर्वीप्रमाणे आजुबाजुच्या सहा ग्रामपंचायतींचे परवाने घ्यावे लागत होते ते घ्यावे लागणार नाहीत. प्राधिकरण आपल्या अधिकारात परवाने देईल. त्यामुळे कामाला गती येईल, असा दावा केला जात आहे. 

चिपीचा विमानतळ आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्त्वावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी बांधलेला. बुधवारी चतुर्थीच्या पूर्वसंध्येला १२ आसनी विमान प्रायोगिक तत्त्वावर या ‘चिपी’वर उतरविण्यात आले. चिपी येथील हा विमानतळ ‘मोपा’ पासून ६0 किलोमीटरच्या आतच आहे. 

टॅग्स :goaगोवाAirportविमानतळsindhudurgसिंधुदुर्ग