शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नाताळ व नववर्षाचा फायदा घेऊन चिनी उत्पादने गोव्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 18:30 IST

मडगाव : गोव्यात नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशी आणि विदेशी पर्यटकांची भीड उसळत असल्याने या संधीचा फायदा घेऊन गोव्याच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चिनी माल येण्याच्या तयारीत असताना, वजन आणि माप खात्याच्या अधिका-यांनी तसेच पोलिसांनी अशा मालांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

मडगाव : गोव्यात नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशी आणि विदेशी पर्यटकांची भीड उसळत असल्याने या संधीचा फायदा घेऊन गोव्याच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चिनी माल येण्याच्या तयारीत असताना, वजन आणि माप खात्याच्या अधिका-यांनी तसेच पोलिसांनी अशा मालांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मडगावात आज बुधवारी या दोन्ही खात्याने छापा मारून अंदाजे चार लाखांचा माल जप्त केला. यात डेकोरेटिव्ह माल तसेच चिनी सिगारेटींचा समावेश आहे.मालभाट-मडगाव येथे वजन आणि माप खात्याने दोन दुकानांवर छापा टाकून तीन लाखांचा माल जप्त केला. वजन आणि माप खात्याचे अधिकारी अरुण पंचवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली तर मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चिनी बनावटीच्या सिगारेट जप्त केल्या.मालभाट येथील साई एन्टरप्रायझर्सच्या दुकानांवर वजन आणि माप खात्याने छापा टाकला. या दुकानांमध्ये चिनी वीज उपकरणे, रोषणाईच्या वस्तू तसेच अन्य चिनी बनावटी वस्तू होत्या. पॅकेज कॉम्युडिटी गुडसच्या कायद्यांतर्गत या खात्याने ही कारवाई केली. जप्त केलेल्या मालांची उत्पादनाची तारीख तसेच अन्य आवश्यक बाबींचा उल्लेख नव्हता. ख्रिसमस सण जवळ येऊन ठेपल्याने बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड उडाली आहे. स्वस्त दरात उपलब्ध असलेली चिनी मालाने बाजारपेठ व्यापली असून, ही उत्पादने ग्राहकांच्या माथी मारल्या जातात.

टॅग्स :ChristmasनाताळgoaगोवाNew Year 2018नववर्ष २०१८