शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र भवनासाठी म्हापशात लवकरच जागा निश्चित करू- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 17:19 IST

पणजी : बार्देश तालुक्याला रवींद्र भवन हवे आहे. म्हापशात आतापर्यंत जागा निश्चित होऊ शकली नाही. आपण पुढाकार घेऊन लवकरच जागा निश्चित करू, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.

पणजी : बार्देश तालुक्याला रवींद्र भवन हवे आहे. म्हापशात आतापर्यंत जागा निश्चित होऊ शकली नाही. आपण पुढाकार घेऊन लवकरच जागा निश्चित करू, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासावेळी थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.करासवाडा- पेडे येथे क्रिकेट स्टेडियमसाठी जी जागा अगोदर घेतली होती, तिथे कोमुनिदादीची जमीन उपलब्ध आहे. तिथे तरी रवींद्र भवन बांधले जावे, आपण स्वत: त्यासाठी कोमुनिदादीशी चर्चा करीन, असे आमदार हळर्णकर यांनी सांगितले. सर्व तालुक्यांमध्ये रवींद्र भवने उभी राहीली पण बार्देशसाठी अजूनही सरकार रवींद्र भवन का उभे करत नाही, अशी विचारणा आमदार हळर्णकर यांनी केली.आमदार दिगंबर कामत व इतरांनी हळर्णकर यांना पाठिंबा दिला. आपण मुख्यमंत्रिपदी होतो तेव्हा म्हापसा शहरात पोलीस स्थानकाच्या विरुद्ध दिशेने असलेल्या जागेत रवींद्र भवनासाठी भूखंड निश्चित केला होता, असे कामत म्हणाले. बार्देशमध्ये सात आमदार असून त्यांनी जागा निश्चित करण्यासाठी सरकारला मदत करावी, आम्हाला बार्देशसाठी रवींद्र भवन बांधायचे आहे. केवळ जागेअभावी सगळे अडले आहे, असे कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे उत्तरादाखल बोलताना म्हणाले.यावेळी आमदार हळर्णकर यांनी तुम्ही पेडे येथेच रवींद्र भवन बांधा, असे सांगितले. कारण म्हापसा शहरात अगोदरच वाहनांची प्रचंड गर्दी झालेली आहे. शहरात वाहतुकीच्या मोठ्या समस्या आहेत. शहराबाहेर रवींद्र भवन असणे चांगले, असे हळर्णकर म्हणाले.मुख्यमंत्री पर्रीकर यांनी यावेळी बोडगेश्वर मंदिर परिसरात रवींद्र भवन व्हावे म्हणून सरकारने प्रयत्न केल्याचे सांगितले. ती जागादेखील शहराच्या बाहेरच येते. बोडगेश्वर मंदिर परिसरातील जमिनीसाठी सुमारे एक हजार कुळे आहेत. त्या सर्वाशी बैठका सुरू असून आता लवकरच त्या सगळ्या कुळांकडून सरकारला ना हरकत दाखला मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.आपण स्वत: गंभीरपणे या विषयात लक्ष घालतो व रवींद्र भवनासाठी जागा निश्चित करतो. पेडण्यामध्ये मंत्री बाबू आजगावकर यांनी जागा दाखवली व त्यामुळे तिथे रवींद्र भवन होत आहे. पेडे येथे देखील रवींद्र भवन बांधता येईल. प्रसंगी जागा विकत घेण्याची सरकारची तयारी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा