शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जीवरक्षकांच्या संपावर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा - दिगंबर कामत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 22:18 IST

काल हरमल किना-यावर एका विदेशी पर्यटकाला जीव गमवावा लागला.

पणजी: जीवरक्षकांच्या संपामुळे मागील काही दिवसांत गोव्यात सुमारे १४ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब यात हस्तक्षेप करुन जीवरक्षकांच्या संपावर तोडगा काढावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. काल हरमल किना-यावर एका विदेशी पर्यटकाला जीव गमवावा लागला. सरकारने या प्रश्नावर संवेदनशीलता दाखवणे महत्वाचे असून, जीवरक्षकाना सरकारी सेवेत सामावून घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करणे गरजेचे आहे, असे दिगंबर कामत यांनी सांगितले. सरकारने त्वरीत यात हस्तक्षेप न केल्यास संपूर्ण पर्यटन व्यवसायच बुडण्याची शक्यता असून त्यामुळे गोवा हे जलसमाधी स्थळ म्हणून राज्याची बदनामी होईल, हे मुख्यमंत्र्यानी लक्षात ठेवावे, असेही त्यांनी म्हटले आहे. आपला जीव धोक्यात घालून, दुस-यांचे जीव वाचविण्याची सेवा बजावणा-या गोमंतकीय जीवरक्षकांना सर्व मदत व सहकार्य देणे सरकारचे कर्तव्य असून, त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे दिगंबर कामत म्हणाले. याचबरोबर, गोव्यातील पर्यटन व्यवसाय सध्या कठिण परिस्थितीतून जात असून, रद्द झालेली चार्टर विमाने, शॅक वाटपात झालेला विलंब तसेच देशात आलेले आर्थिक मंदीचे सावट यामुळे पर्यटन उद्योगावर परिणाम झाला आहे. सरकारला पर्यटन उद्योगाला उभारी देण्यासाठी त्वरीत उपाय काढणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यानी त्वरित संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व गोमंतकीय जीवरक्षकाना सरकारी सेवेत घेण्यासाठी पावले उचलावीत, असेही आवाहन दिगंबर कामत यांनी केले आहे.   

टॅग्स :goaगोवा