शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचा भ्रष्टाचार लपवू नये : काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 18:46 IST

पणजी : सरकारी कर्मचारी नोकऱ्या विकतात असे सांगून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लाचखोर कर्मचा:यांविरुद्ध कारवाईची भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री जर ...

पणजी : सरकारी कर्मचारी नोकऱ्या विकतात असे सांगून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लाचखोर कर्मचा:यांविरुद्ध कारवाईची भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री जर खरोखर याविषयी गंभीर असतील तर आम्ही त्याचे स्वागत करतो पण मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांच्या स्तरावर होत असलेला मोठा भ्रष्टाचार पहावा व त्याविरुद्ध बोलावे, तरच लोक त्यांच्या हेतूमागिल सत्यता मान्य करतील, असा सल्ला गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शनिवारी येथे दिला.

चोडणकर यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हादोळकर, प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्र्यांनी ते सरकारी कर्मचा:यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करू पाहत आहेत असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. ते उगाच आभास निर्माण करत आहेत की ते खरोखर कारवाई करू पाहतात असा प्रश्न निर्माण होतो. कारण एक-दोन सरकारी कर्मचारी नोक:या विकतात अशी तक्रार आल्याचे मुख्यमंत्री म्हणतात. मात्र मंत्र्यांच्या स्तरावर जो प्रचंड भ्रष्ट व्यवहार होत असतो, त्याविरुद्ध मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. मुख्यमंत्री त्याविषयी गप्प का आहेत असा प्रश्न लोकांना पडतोय. ते भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्याविषयी प्रामाणिक असतील तर ते निश्चितच मंत्र्यांच्याही भ्रष्टाचाराविरुद्ध बोलतील असे चोडणकर म्हणाले.

कारकुनांसारखे काही सरकारी कर्मचारी लाचखोरी करत असतील तर त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हायलाच हवी. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे स्वागत करून पाठींबाही देतो पण मुख्यमंत्र्यांना अगोदर मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध पाऊले उचलावी लागतील. कारण ते प्रमाण मोठे आहे. मांडवी नदीत एका बेकायदा तरंगत्या हॉटेलचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतेच उद्घाटन केले. ज्या हॉटेलला सीआरङोड किंवा अन्य कसलाच परवाना नाही, त्याचे मुख्यमंत्री उद्घाटन करतात. त्यातून ते सरकारी यंत्रणाना कोणता संदेश देतात ते कळून येते. तक्रार आल्यानंतर सरकारी यंत्रणा जेव्हा त्या हॉटेलची पाहणी करण्यासाठी जातात तेव्हा ते तरंगते हॉटेल काहीजण गायब करतात. ते आमोणा- साखळी येथे कुणी तरी नेऊन ठेवल्याची चर्चा आहे. या हॉटेलशी एका मंत्र्याचाच संबंध आहे, असे चोडणकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी कारवाई करावी, असेही चोडणकर म्हणाले.