शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची प्रकृती सुधारल्याचा नगरनियोजन मंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 21:26 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती एम्समध्ये उपचारासाठी होते त्यापेक्षाही आता सुधारली आहे. त्यांची स्मृतीही चांगली आहे, असा दावा नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी केला. 

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती एम्समध्ये उपचारासाठी होते त्यापेक्षाही आता सुधारली आहे. त्यांची स्मृतीही चांगली आहे, असा दावा नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी केला. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ‘ विरोधक ज्या पध्दतीने पर्रीकर यांचे चित्र रंगवित आहेत ते चुकीचे आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत माझे तीन विषय त्यांनी प्रामुख्याने घेतले आणि त्यावर स्वत:हून चर्चाही केली. सासष्टी तालुक्याचे दोन महत्त्वाचे विषय गेली अनेक वर्षे पडून होते. हे विषय टाळले जात आहेत की काय, असे मला वाटले होते परंतु पर्रीकर स्वत:च या विषयांवर बोलले आणि मार्गही काढला. गेली ३0 वर्षे काँग्रेसने हे प्रश्न सोडवले नव्हते. त्यांची स्मृतीही चांगली आहे.’सरदेसाई पुढे म्हणाले की, ‘पर्रीकर हे कामसू असल्याने नेहमीच कामात गर्क रहात असत. त्यांच्या आजारपणामुळे सरकारवर परिणाम झाला आहे, हे मान्य करावेच लागेल.’मध्यंतरी स्थापन केलेल्या जी-६ गटाबाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता हा गट अजून जिवंत आहे, असे सरदेसाई म्हणाले. नेतृत्त्वाबाबत कायमस्वरुपी तोडगा मिळाला का, या प्रश्नावर पर्रीकर हेच सध्या आमचे नेते आहेत आणि तेच मुख्यमंत्री आहेत, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली. 

मासळी व्यापा-यांना मार्गदर्शक तत्त्वे पाळावीच लागणार : सरदेसाई मासळी आयातीबाबत शेजारी सिंधुदुर्गातील आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या इशा-याचा मंत्री सरदेसाई यांनी समाचार घेतला. मासळी आयात करणा-यांकडे एफडीएची नोंदणी आणि इन्सुलेटेड वाहन या अटी पाळाव्याच लागतील.  त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि कोणाच्या धमक्याही सहन केल्या जाणार नाहीत, असे ते म्हणाले. सिंधुदुर्गातील मासळीवाहू वाहने अडविल्यास गोवा पासिंगचे एकही वाहन सिंधुदुर्गातून जाऊ देणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला होता. गोव्यातील लोकांना दर्जेदार अन्न, मासळी मिळावी यासाठी सरकार कटिबध्द आहे. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा