शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सोमवारी घेणार मंत्रिमंडळाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 12:57 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या सोमवारी त्यांच्या करंजाळे येथील निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची दाट शक्यता आहे.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या सोमवारी त्यांच्या करंजाळे येथील निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी तशी कल्पना कृषी मंत्री तथा गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांना दिली आहे. मंत्री सरदेसाई हे दुबईच्या दौ-यावर गेले आहेत. निघण्यापूर्वी त्यांनी गुरुवारी करंजाळे येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पर्रीकर यांची भेट घेतली. आपण सोमवारी घरी मंत्रिमंडळाची बैठक घेऊ इच्छितो, असे पर्रीकर यांनी सरदेसाई यांना सांगितले. सरदेसाई यांनी त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. आपण दुबईला जात असल्याने कदाचित सोमवारी बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही, पण तुम्ही मंत्रिमंडळ बैठक घ्या, असे सरदेसाई यांनीही पर्रीकर यांना सुचविले.पर्रीकर यांनी यापूर्वीही एकदा त्यांच्या खासगी निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेतलेली आहे. त्यांनी भाजप आमदारांचीही स्वतंत्र बैठक घेतली होती. आता दुस-यांदा ते मंत्रिमंडळाची बैठक आपल्या घरी घेतील. मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याचा विषय अगोदरच न्यायालयात पोहचलेला आहे. न्यायालयात त्याविषयीची याचिका आहे. तथापि, पर्रीकर मंत्री, आमदार, अधिकारी यांच्या बैठका घेतात व त्यामुळे प्रशासन ठप्प झालेय असे म्हणता येत नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. सरकारने न्यायालयासमोरही आपले म्हणणे ठेवलेले आहे.मंत्रिमंडळाच्या यापूर्वीच्या बैठकीत काही मोठे प्रस्ताव मंजूर झाले नव्हते.तथापि, यावेळी काही महत्त्वाचे प्रस्ताव चर्चेला येण्याची शक्यता आहे. सरकारमधील काही मंत्रीही पर्रीकर यांना भेटू इच्छीत आहेत. मंत्रिमंडळ बैठक ही अशा मंत्र्यांसाठी एक संधी असेल. पर्रीकर यांची प्रकृती आता पूर्वीच्या तुलनेत सुधारली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी सातत्याने होत असते, असे सूत्रांनी सांगितले. सरकारमध्ये नेतृत्व बदल होईल अशी चर्चा असली तरी, पर्रीकर व सरदेसाई यांच्यात चर्चा झाली तेव्हा पर्रीकर यांनी मात्र तूर्त बदल नाहीत, असे संकेत सरदेसाई यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकर