शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी ऐकली कार्यकर्त्यांची गा-हाणी; भाजपा नेते, पदाधिकारी उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 22:15 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गुरुवारी भाजपाच्या पणजीतील मुख्य कार्यालयात तीन ते चार तास उपस्थित राहिले व त्यांनी राज्यातील सात- आठ मतदारसंघांतील भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे, त्यांच्या मागण्या व अपेक्षा जाणून घेतल्या.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गुरुवारी भाजपाच्या पणजीतील मुख्य कार्यालयात तीन ते चार तास उपस्थित राहिले व त्यांनी राज्यातील सात- आठ मतदारसंघांतील भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे, त्यांच्या मागण्या व अपेक्षा जाणून घेतल्या.भाजपाने आपल्या प्रत्येक मंत्र्याला पंधरा दिवसांनी एकदा भाजपाच्या पणजीतील कार्यालयात बसून कार्यकर्त्यांना भेटण्याची सूचना केली आहे. लोकांच्या गर्दीमध्ये मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणे भाजपाच्या कार्यकर्त्यांना अनेकवेळा शक्य होत नाही. त्यामुळे पक्षाच्या कार्यालयात महिन्यातून दोनवेळा तरी मंत्री बसावेत अशी कल्पना पुढे आली. यापूर्वी आरोग्य मंत्री विश्वजित राणे, वीज मंत्री पांडुरंग मडकईकर, केंद्रीय आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक वगैरे भाजपच्या कार्यालयात बसले व त्यांनी कार्यकत्र्याचे मन जाणून घेतले. काही कार्यकर्त्यांना त्यावेळी नोकरीची अपेक्षा व्यक्त केली तर काही कार्यकर्ते तसेच भाजपच्या नगरसेवकांनी आपआपल्या भागातील सार्वजनिक समस्या सुटण्याच्यादृष्टीने आपली मते मांडली होती. भाजपाच्या नगरसेवकांनीही अनेक समस्या मांडल्या होत्या. लोकांना व भाजपा कार्यकर्त्यांना समस्या जलदगतीने सुटलेल्या हव्या आहेत. प्रशासकीय पातळीवरील अडचणी लवकर दूर व्हाव्यात ही सर्वाचीच अपेक्षा आहे.बुधवारी मुख्यमंत्री पर्रीकर दुस-यांदा भाजपाच्या कार्यालयात कार्यकर्त्यासाठी उपस्थित राहिले. पहिल्यांदा ते दि. 8 डिसेंबरला उपस्थित राहिले होते. सात-आठ मतदारसंघांतील दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. काही कार्यकर्त्यांनी स्वत:चे व्यक्तिगत, कौटुंबिक प्रश्न सांगितले तर अनेकांनी विकास कामांविषयीच्या मागण्या मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी विविध प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो हे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भाजपा कार्यालयात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मध्यंतरी आपल्या कन्येच्या विवाह सोहळ्य़ात गुदिन्हो व्यस्त राहिले, त्यामुळे ते पक्ष कार्यालयात येऊ शकले नाहीत, असे भाजपच्या पदाधिका-यांनी सांगितले. फ्रान्सिस डिसोझा हे ज्येष्ठ मंत्री आजारी होते. तरी ते यापुढील काळात पक्ष कार्यालयात येतील.दरम्यान, भाजपाने राज्यभर बूथ विस्ताराची योजना अंमलात आणली. त्याचा समारोप येत्या 30 रोजी होणार आहे. सायंकाळी चार वाजता मळा येथील कम्युनिटी सभागृहात भाजपाचा सोहळा होईल व त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह अनेक भाजपा नेते, पदाधिकारी व बूथ विस्तारक उपस्थित राहतील.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा