म्हापसा : पंचशताब्दी वर्षाचा इतिहास लाभलेल्या उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यातील वरगाव-पिळगाव येथील श्री चामुंडेश्वरी देवस्थानला भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मंगळवारी संध्याकाळी सदिच्छा भेट देऊन जगदंबा चामुंडेश्वरी देवीचे दर्शन घेतले.सरन्यायाधीश बोबडे यांचे मंदिरात आगमन झाल्यानंतर देवस्थान अध्यक्ष तुषार टोपले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मंदिरात देवस्थानचे पुरोहित श्रीनिवास सायनेकर व भालचंद्र सायनेकर यांनी मंत्रपुष्पांजली करून सरन्यायाधीशांना आशिर्वाद दिला.त्यानंतर देवस्थान अध्यक्ष तुषार टोपले यांच्या हस्ते भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा शाल, श्रीफळ, श्रीदेवी चामुंडेश्वरीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी देवस्थानचे मुखत्यार दीपक गोवेकर, कमिटी सदस्य नारायण गोवेकर, वासुदेव आमोणकर उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी घेतले चामुंडेश्वरीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 21:09 IST