शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांनीच दिला 'स्वराज'चा मंत्र: मंत्री विश्वजीत राणे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:59 IST

उसगावात शिवजयंती जल्लोषात; ढोल-ताशे, स्पर्धांनी रंगला उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क, उसगाव : "स्वराज म्हणजे आत्मसन्मानाने, स्वतःचे नियम राबवत उभारलेला स्वदेशी राज्यकारभार. मुघल, आदिलशाही व निजामशाही सत्तांविरुद्ध स्वराज्य स्थापनेसाठी 'स्वराज' ही संकल्पना सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले. उसगाव बाराजण येथे शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंती कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

काल गुरुवारी उसगाव परिसर भगव्या रंगात न्हाऊन निघाला होता. ढोल-ताशांचा गजर, जोशपूर्ण पोवाडे आणि पारंपरिक वेशभूषेतील तरुणाईच्या सहभागामुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले. शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. उसगावात भगवे ध्वज, ढोल-ताशांचा गजर, पोवाडे आणि पारंपरिक वेशभूषेत तरुणाईने सहभाग घेत शिवरायांना अभिवादन केले.

उसगाव क्षेत्र मर्यादित विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज, बालशिवाजी आणि जिजामाता वेशभूषा व पोवाडे स्पर्धा आयोजित करून शिवरायांचे विचार घराघरांत पोहोचवण्यात आले. सकाळी उसगाव बाराजण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक सर्कल मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व राजमुद्रेची पूजा करण्यात आली.

उसगाव बाराजण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक सर्कल मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास मंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तेथून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक उसगाव पंचायतीच्या जुन्या इमारतीकडे आली. पंचायतीच्या आवारात मुख्य कार्यक्रम सादर करण्यात आला.

यावेळी मंत्री विश्वजित राणे यांच्यासह शिवप्रेमी प्रदीप बखले, उसगावचे सरपंच संजय गावडे, उपसरपंच संगीता डोईफोडे, पंच रामनाथ डांगी, गोविंद परब फात्रेकर, राजेंद्र नाईक, रेश्मा मटकर, नरेंद्र गावकर, वैभवी गावडे, विनोद मास्कारेन्स, विलियम मास्कारेन्हस, उसगाव जिल्हा पंचायत सदस्य समीक्षा नाईक, माजी उसगाव जि.पं. सदस्य उमाकांत गावडे, फोंडा गटविकास अधिकारी आश्विन देसाई, विनोद शिंदे, शिवाजीच्या वेशभूषेत राजेश बोरकर उपस्थित होते. विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण केले. स्वागत संजय ऊर्फ प्रकाश गावडे यांनी केले. सूत्रसंचालन अजय बागकर व मयूर बाळवे यांनी केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shivaji Maharaj Gave the Mantra of 'Swarajya': Minister Vishwajit Rane

Web Summary : Minister Vishwajit Rane stated that Shivaji Maharaj conceived 'Swarajya,' a self-governing state, to counter Mughal, Adilshahi, and Nizamshahi rule. He spoke at the Shiv Jayanti celebration in Usgaon, Goa, where festivities included processions, traditional attire, and competitions honoring Shivaji Maharaj.
टॅग्स :goaगोवाShivjayantiशिवजयंतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज