शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य खाण घोटाळ्यात आरोपपत्र दाखल; दिगंबर कामत, व्ही काडणेकर प्रमुख आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 21:36 IST

खाण घोटाळयातील मुख्य प्रकरणात विशेष तपास पथकाकडून पणजी विशेष सत्र न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पणजी: खाण घोटाळयातील मुख्य प्रकरणात विशेष तपास पथकाकडून पणजी विशेष सत्र न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३५ कोटी रुपये घोटाळ््याच्या या प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, खाणमालक वैकुठराव काढणेकर आणि खाण खात्याच्या अधिकाºयांना प्रमुख संशयित करण्यात आले आहे.खाणीला बेकायदेशीरपणे कंडोनिशन आॅफ डिलेखाली खाण सुरू करण्याचा परवाना देण्यात आल्याचे आणि त्यात माजी मुख्यमंत्री कामत आणि खाण अधिकाºयांवर ठपके ठेवण्यात आले आहे. खाण मालक, तत्कालीन खाण मंत्री आणि खाण अधिकारी यांच्या संगनमताने हा घोटाळा केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. खाण खात्यातील अधिकाºयांची अरोपी म्हणून नोंद करण्यात आली आहेत त्यात भूगर्भ शस्त्रज्ञ  एटी डिसोझा, निवृत्त सह भूगर्भशास्त्रज्ञ हेक्टर फर्नांडीस यांचा समावेश आहे.  मॅग्नम मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेडचे रविंद्र प्रकाश आणि प्रशांत साहू यांनाही आरोपी बनविण्यात आले आहे.  या घोटाळ्यात सरकारला १३५ कोटी रुपयांचा फटका बसल्याचेही म्हटले आहे. खाण खात्याचे सचीव आयएएश अधिकारी राजीव यदुवंशी यांनी काढणेकर माईन्सला कंडोनेशन आॅफ डिले देऊ नका असे सांगितले होते. राज्य सरकारला तो अधिकार नसल्याचेही स्पष्ट केले होते. परंतु मुख्यमंत्री कामत यांनी आपले राजकीय अधिकार वापरून त्यांना कंडोनेशन डिले  मंजूर केल्याची जबानी यदुवंशी यांनी दिली आहे. शिवाय माजी खाण  संचालक जे बी भिंगी यांचीही साक्ष कामत यांच्या विरोधात नोंदविली गेली आहे. वास्तविक खाण घोटाळा हा ३५ हजार कोटी रुपयांचा असल्याचा शाह आयोगाचा दावा होता. परंतु त्यानंतर झालेल्या तपासातून मुख्यता चाटर्ड अकाउंटंटच्या छाननीतून हे नुकसान १३५ कोटी रुपये झाले असल्याचे आढळून आले आहे असे आरोपपत्रात एसआयटीने म्हटले आहे. अलिकडच्या काळातील सर्वात मोठा घोटाळा म्हणून गणला गेलेल्या या घोटाळ््यातील या प्रकरणाचा तपास निरीक्षक दत्तगुरू सावंत आणि उपनिरीक्षक सतीश पडवळकर यांनी केला.