शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दाबोळी विमानतळाच्या विस्ताराला केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 13:02 IST

गोव्यातील दाबोळी विमानतळाच्या विस्ताराला केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाने परवानगी दिली आहे. धावपट्टीचे नूतनीकरण व इतर डागडुजीही होणार आहे.

पणजी : गोव्यातील दाबोळी विमानतळाच्या विस्ताराला केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाने परवानगी दिली आहे. धावपट्टीचे नूतनीकरण व इतर डागडुजीही होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १८३ कोटी ४0 लाख रुपये खर्चाच्या या विस्तारकामात धावपट्टीची क्षमता वाढविली जाईल. विमानांना सध्या जागा अपुरी पडते त्यामुळे अनेकदा येथे येणाºया चार्टर विमानांनाही पार्किंगसाठी अन्य विमानतळांवर जावे लागते. धावपट्टीची क्षमता वाढविल्याने विमानांचे वेळापत्रकही सुटसुटीत होईल तसेच अतिरिक्त पार्किंगची सोयही केली जाईल.गेल्या आॅक्टोबर महिन्यात या विस्तारकामासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार बी ४७४ या मोठ्या विमानांसाठी समांतर ट्रॅक तसेच धावपट्टीची सोय केली जाईल. दाबोळीचा हा विमानतळ नौदलाच्या ताब्यात आहे त्यामुळे विमानतळ प्राधिकरण व भारतीय नौदल खर्चाचा प्रत्येकी निम्मा वाटा उचलणार आहे. ३0 महिन्यांच्या कलावधीत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

सध्या दाबोळी विमानतळावर गर्दीच्याक्षणी एकाचवेळी २७५0 प्रवाशी हाताळण्याची क्षमता आहे. या विमानतळावर पाच एअरोब्रीज आणि आठ विमाने पार्क करण्याची सोय आहे. ८ क्रमांकाच्या धावपट्टीजवळ समांतर ट्रॅक नसल्याने विमानांना सिव्हिल अ‍ॅप्रॉनमध्ये वळसा घेऊन यावे लागते त्यामुळे अन्य धावपट्ट्यांवरही विमानांच्या उड्डाणांवर तसेच लँडिंगवर परिणाम होतो. ही गैरसोय टाळण्यासाठी काही सुधारणा घडवून आणण्यात येणार आहेत.

मोपा येथे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ येत असल्याने दाबोळी बंद होणार अशी भीती खास करुन दक्षिण गोव्यातील लोकांमध्ये होती. आता दाबोळीच्या विस्ताराला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडूनच हिरवा कंदिल मिळालेला असल्याने ही भीती दूर होईल, अशी अपेक्षा आहे.एका अंदाजानुसार गोव्यात येणा-या विमान प्रवाशांची संख्या दरवर्षी साधारणपणे ३0 टक्क्यांनी वाढत आहे. त्यामुळे दाबोळी आणि भविष्यात मोपा अशा दोन्ही विमानतळांची गरज भासणार आहे. अधिकृत सरकारी आकडेवारीनुसार गोव्याला वर्षाकाठी भेट देणाºया पर्यटकांची संख्या ८0 लाखांवर पोचली आहे. त्यामुळे दाबोळी विमानतळाचा विस्तार आणि मोपा ग्रीनफिल्ड विमानतळ ही काळाची गरज असल्याचे गोवा टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल संघटनेचेही म्हणणे आहे. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर