शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांसाठी राखीव पार्किंग जागेत सीसीटीव्ही, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 22:24 IST

उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी राजधानी शहरात ज्या सहा जागा अशा पार्किंगसाठी अधिसूचित आहेत तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश दिले आहेत.

पणजी : दिव्यांगांसाठीच्या राखीव पार्किंग जागेत भलतीच वाहने ठेवण्यात येत असल्याने या प्रकाराची गंभीर दखल घेत उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी राजधानी शहरात ज्या सहा जागा अशा पार्किंगसाठी अधिसूचित आहेत तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पोलिसांनी या जागांवर आकस्मिक भेटी देऊन दंडात्मक कारवाई करावी, असे बजावले आहे.अतिरिक्त जिल्हाधिकारी विकास गावणेकर यांनी वाहतूक पोलिस उपाधीक्षकांना वरील निर्देश दिलेले आहेत. एक जागरुक नागरिक मुकुंदराज मुद्रस हेही दिव्यांगांवर होणा-या या अन्यायाचा पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सातत्याने याबाबतीत तक्रारीही केलेल्या आहेत. डिसेबिलिटी राइटस असोसिएशन ऑफ गोवा या संघटनेचे अध्यक्ष आवेलिनो डिसा यांनीही अलीकडेच शहर पोलिसांत तक्रार करून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांसाठी राखीव जागा दर्शविणारा फलक उलटा फिरविण्यात आल्याचे निदर्शनास आणले होते. पोलिसांनी त्यानुसार अज्ञातांविरुद्ध पीडीपी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हाही नोंदविला आहे.दिव्यांगांसाठी पार्किंगकरिता या आहेत ६ जागा!१. कदंब बसस्थानकावर २. विद्युत भवनसमोर ३. जुन्ता हाऊस इमारतीसमोर ४. समाजकल्याण खात्यासमोर ५. सरकारी मुद्रणालयाजवळ ६. ईडीसीनजीक श्यामराव विठ्ठल बँकेजवळ दिव्यांगांसाठी राखीव पार्किंग जागा आहेत. दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या पार्किंग जागेत इतर लोकांबरोबरच सरकारी वाहनेही बिनदिक्कत ठेवून दिव्यांगांना त्यांचा हक्क नाकारण्यात येत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. त्यामुळे शहरातील या सहा पार्किंग जागांमध्ये प्रत्येकी किमान एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा, असे बजावण्यात आले आहे. 

टॅग्स :cctvसीसीटीव्ही