शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डिचोली शांतादुर्गा विद्यालयातून रोख रक्कम, कॅमेरा व मोबाईल लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 19:13 IST

चोरट्यांकडून शाळा टार्गेट.

विशांत वझे, डिचोली : डिचोलीतील हमरस्त्यालगत असलेल्या श्री शांतादुर्गा विद्यालयाचा मुख्य दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश करत कपाटे उघडून अंदाजे बारा ते पंधरा हजार रुपये रोख, एक मोबाईल व एक कॅमेरा लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.

काही दिवसांपूर्वी कुडणे येथील एका हायस्कूलमध्ये अशीच चोरी करून ७० हजार रोख लंपास करण्याची घटना घडली होती. नाताळनिमित्त शाळांना सुट्ट्या असल्याने चोरट्यांनी हायस्कूलमध्ये चोरी करण्याचे सत्र चालविले आहे. अनेक विद्यालयात  दहावी परिक्षेचे शुल्क गोळा केलेली असून इंटरनेट चालत नसल्याने  पैसे शाळेत ठेवण्यात आले आहेत. याच पैशांवर डल्ला मारण्याच्या उद्देशाने चोरीच्या घटना घडत आहेत. 

चोरी प्रकरणी मुख्याध्यापिका ऍडना रॉड्रिग्ज यांनी पोलिसात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनीही पाहणी केली. विद्यालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोघेजण कैद झाले आहेत. चोरटे कार्यालयातील कपाटे उघडून पडताळणी करतानाही कॅमेऱ्यात टीपले गेले आहेत.

संस्थेचे अध्यक्ष विजय सरदेसाई  यांनी अंदाजे पंधरा हजार  रोख तसेच  कॅमेरा व मोबाईल चोरट्यांनी लंपास केला आहे. डिचोली पोलिस तपास करत आहेत.  शाळांनी सावधान राहवे..चोरट्यांनी शाळांना लक्ष केल्याने शाळा व्यवस्थापनाने काळजी घेण्याचे तसेच रोख रक्कम शाळेत ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. डिचोली तालुक्यात रात्रीची पोलिस गस्त वाढवावी, अशी वाढती मागणी आहे.दरम्यान, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी डिचोलीतील चोरी प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करण्याचे  निर्देश दिले आहेत. 

टॅग्स :goaगोवा