शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आयरिश युवती खून प्रकरणात शेवटी संशयिताला क्लोन कॉपी, दररोज सुनावणी घेण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 16:43 IST

आयरिश युवती डॅनियली मॅक्लॉग्लिन हिच्यावर बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप असलेल्या काणकोण येथील विकट भगत याच्याविरुद्धची सुनावणी सीसीटीव्ही फुटेजची क्लोन प्रत संशयिताला न दिल्यामुळे रखडली होती.

मडगाव: होळी उत्सवाच्यादरम्यान राजबाग-काणकोण येथे आलेली आयरिश युवती डॅनियली मॅक्लॉग्लिन हिच्यावर बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप असलेल्या काणकोण येथील विकट भगत याच्याविरुद्धची सुनावणी सीसीटीव्ही फुटेजची क्लोन प्रत संशयिताला न दिल्यामुळे रखडली होती. बुधवारी अभियोग पक्षाने ही क्लोन प्रत न्यायालयाला सादर केल्यानंतर ही प्रत संशयिताकडे सुपूर्द करण्यात आली.दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश सायोनोरा लाड यांच्यासमोर ही सुनावणी चालू असून या प्रकरणात आंतरराष्ट्रीय स्तरांवरून दबाव असल्यामुळे ही सुनावणी दररोज घ्यावी, अशी मागणी अभियोग पक्षातर्फे करण्यात आली होती. मात्र क्लोन प्रत न मिळाल्यामुळे आतापर्यंत ही सुनावणी रखडली होती.ही प्रत सादर केल्यानंतर आता आरोप निश्चितीपूर्वीचा युक्तिवाद करण्यासाठी 27 नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आल्याची माहिती सरकारी वकील व्ही. कोस्ता यांनी दिली. काणकोण पोलिसांनी हैदराबादहून ही क्लोन प्रत मिळवली आहे, अशी माहिती काणकोणचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई यांनी दिली.या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, होळीच्या दरम्यान गोव्यात पर्यटक म्हणून आलेल्या मॅक्लॉग्लीन हिचा 14 मार्च रोजी राजबाग - काणकोण येथे विवस्त्रवास्थेत मृतदेह सापडला होता. तिच्या अंगावरील जखमांवरून हा खुनाचा प्रकार असल्याचे उघड झाले होते. तिचा खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचेही उघड झाले होते.ही खुनाची घटना होण्याच्या काही तासांपूर्वी संशयित विकट भगत व डॅनियली यांना एका रेस्टॉरंटजवळ पाहिले होते. या रेस्टॉरंटच्या सीसीटीव्ही कॅमे-यावरही त्या दोघांच्या हालचाली चित्रीत झाल्या होत्या. त्यावरून पोलिसांनी नंतर विकटला अटक करून बलात्कार करून खून करणे या आरोपाखाली न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले होते. संशयिताचे वकील अरुण ब्राझ डिसा यांनी या चित्रफितीची क्लोन कॉपी संशयिताला मिळावी, असा अर्ज केला होता. अ‍ॅड. डिसा यांच्या मते या खुनाचे हे संपूर्ण प्रकरण संशयित व मृत यांना शेवटच्या क्षणी एकत्र पाहिल्याच्या पुराव्यावर अवलंबून असून, त्यामुळे या चित्रफितीची प्रमाणित प्रत अभ्यासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचा दावा केला होता. जोपर्यंत ही क्लोन प्रत मिळत नाही तोपर्यंत संशयिताच्यावतीने बाजू मांडणे अशक्य असल्याची भूमिका घेतली होती.सात महिन्यांपूर्वी घडलेल्या या खुनामुळे संपूर्ण युरोप हादरून गेला होता. या प्रकरणात केवळ एका विकटचाच हात नसून इतरांचाही त्यात समावेश असावा असा संशय त्यावेळी मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता. त्यानंतर विकटनेही आपल्या बहिणीला लिहिलेल्या एका पत्रात या खुनात आपला हात नसून आपल्या मित्रांचा हात असल्याचा दावा केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते.

टॅग्स :goaगोवा