पणजी: सडा जेलमध्ये करण्यात अालेल्या विनायक कार्बोटकर याच्या खून प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाकडून १२ जणांवर वास्को प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. जेलरचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात अला आहे. विनायक कार्बोटकरच्या खून प्रकरणाचा तपास पूर्ण करून गुन्हा अन्वेषण विभागाकडून अरोपपत्र दाखल केले असून ज्याच्यावर खटले सुरू अाहेत असा १२ आरोपींवर गुन्हे ठेवण्यात आले आहेत. जेलरच्या खुनाचा प्रयत्न करणे, तसेच जेलच्या प्रॉपर्टीची नासधूस करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. ज्यांच्यावर अरोप ठेवण्यात आले आहेत त्यांची नावे राहूल जोसेफ कुमार, महम्मद सलीम शेख, जॉर्ज जेम्स फर्णांडीस, चंद्रु पाटील, देवा बिस्वास, पॉल चिमा, हमीद बेपारी, महम्मद झकीर हुसेन, अन्नु राधे सिंग, स्नेहल डायस, अॅन्थनी फर्नांडीस अक्षय मडवळ अशी आहेत. २५ जानेवारी २०१७ रोजी सडा तुरुंगात कैद्यांनी मोठा राडा करून थैमान माजविले होते. या गोंधळात कार्बोटकर याचा खूनही करण्यात आला होता. एका वर्षानंतर प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
कार्बोटकर खून प्रकरण : १२ कैद्यांवर आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 22:43 IST