शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तिघांना जलसमाधी! माय-लेकराचा मृतदेह सापडला; आईच्या मिठीत होते लेकरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 09:35 IST

तारीपाटो-सांगे येथील नदीत कार बुडाली, तीन तासांहून अधिक कॉळ शोधमोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क सांगे : तारीपाटो- सांगे येथील नदीत सोमवारी कार कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा बुडुन मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीतून कार बाहेर काढली असता आई व मुलगा मृतावस्थेत सापडले तर पती मिलिंद नाईक (वय ३८) यांचा शोध सुरू आहे. रेखा यादव (वय ३५) व दिव्यांश नाईक (२ वर्ष), अशी मृतांची नावे आहेत.

सांगे पोलिस व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किणामळ सांगे येथील मिलिंद नाईक हे आपल्या पत्नी व दोन वर्षांच्या मुलासह जीए ०१ आर ९१५८ कारने सांगेच्या दिशेने जात होते. तारीपाटो येथील पुलावरून जात असताना पुलावरील खोलगट भागाचा अंदाज न आल्याने त्यांची कार थेट नदीत कोसळली. नदी पात्रात काहीतरी कोसळल्याचा आवाज स्थानिकांना आल्यानंतर त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली.वाहनाच्या लाईट्स सुरू असल्यामुळे लोकांना पात्रात वाहन पडल्याचे दिसून आले. स्थानिकांनी तातडीने सांगे पोलिस व अग्निशमन दलाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यावर पोलिस व अग्निशमनचे जवान घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने युध्दपातळीवर बचावकार्य सुरू झाले. पुलाच्या उतरणीवरून जात असताना ही घटना घडली. पुलाला संरक्षक कठडे असते तर ही दुर्दैवी घटना घडली नसती, अशी चर्चा सुरू होती.

दरम्यान, तीन तासांनंतर नदी पात्रात पडलेल्या कारचा शोध लागला. त्यानंतर अग्निशमनच्या जवानांनी ही कार बाहेर काढली असता कारमध्ये माय-लेकराचा मृतदेह सापडला. तर पती मिलिंद यांचा शोध सुरू आहे.

आईच्या मिठीत होते लेकरु

तारीपाटो नदी पात्रात बुडालेली कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असताना नेमके कितीजण बुडालेत? कोणाची कार? "अशी चर्चा सुरू होती. त्याचवेळी पात्रात कारचा सुगावा लागला. अग्निशमन दलाच्या जवानांनी का माय-लेकराचा मृतदेह दिसून आला. आपल्या आईच्या कुशीत बसून प्रवास करणाऱ्या दोन वर्षांचा दिव्यांश तिच्याच मिठीत निपचीत पडला होता. हृदय पिळवटून टाकणारे हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

मुलीचा हंबरडा अन् वडिलांचा शोध सुरु

कार नदीत पडल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक जमू लागले, नदी पात्रातून कार बाहेर काढल्यानंतर आई व मुलाचा मृतदेह कारमधून काढून सांगे इस्पितळात नेण्यात आला. त्यावेळी मिलिंद नाईक यांच्या मुलीने मृतदेह पाहून हंबरडा फोडला. तसेच आईला कार चालवता येत नव्हती, बाबाही सोबत होते. ते कुठे आहेत असे म्हणून ती रडू लागल्यानंतर मिलिंद नाईक यांचा शोध सुरु झाला.

 

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात