शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलोपमेंट फ्रंटचे उमेदवार जाहीर

By समीर नाईक | Updated: March 31, 2024 15:55 IST

अधिसूचनेनुसार ताळगाव पंचायत चार प्रभाग हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

पणजी: ताळगाव पंचायतची निवडणुका २८ एप्रिल रोजी होणार आहे. एकूण ११ प्रभागाचे प्रतिनिधी यावेळी निवडून येणार आहे. हल्लीच पंचायत खात्यातर्फे याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या पार्श्वभूमीवर बाबुश मोंसेरात आणि ताळगावच्या आमदार तथा जेनिफर मोंसेरात यांनी आपला पॅनल जाहीर केले आहे. अधिसूचनेनुसार ताळगाव पंचायत चार प्रभाग हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. एक प्रभाग ओबीसीसाठी आणि प्रभाग क्रमांक ५ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या नुसार मोंसेरात कुटुंबियांकडून ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलोपमेंट फ्रंट नावाने आपले पॅनल जाहीर केले आहे.

ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलोपमेंट फ्रंटमध्ये प्रभाग क्र. १ मधून सिद्धी केरकर (ओबिसी), प्रभाग क्र. २ मधून आग्नेलो डिकुन्हा, प्रभाग क्र. ३ मधून हेलेना परेरा (महिला), प्रभाग क्र. ४ मधून रतिका रवींद्र गावस (महिला), प्रभाग क्र. ५ मधून उषांत काणकोणकर (एसटी), प्रभाग क्र. ६ मधून एस्टेला डिसोझा (महिला), प्रभाग क्र. ७ मधून जानू रोझारियो, प्रभाग क्र. ८ मधून मारिया फर्नांडीस, प्रभाग क्र. ९ मधून संजना दिवकर (महिला), प्रभाग क्र. १० मधून सागर बांदेकर, आणि प्रभाग क्र. ११ मधून सिडनी बरॅटो यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ताळगाव गावाचे मूळ वैभव राखून ठेवून एका आदर्श गावास साजेसा विकास करून तो कायम राखला आहे आणि त्यामुळे प्रत्येक ताळगावकराला त्याचा सार्थ अभिमान वाटतो. ताळगाव कम्युनिटी सेंटर, कचरा संकलन सुविधा, चिल्ड्रन्स पार्क, बॅडमिंटन कोर्ट आणि उद्याने अशा विविधांगी साधनसुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही संघटीतपणे काम केले आहे. यापुढे असेच काम आम्ही सुरू ठेवणार आहोत, असे जेनिफर मोंसेरात यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूक