शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बार्देस बाजार ग्राहक सहकारी संस्थेच्या माजी अध्यक्षांचे सदस्यत्व रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 18:29 IST

म्हापसा : गोव्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था धी बार्देस बझार ग्राहक सहकारी संस्थेच्या गुरुवारी घेण्यात आलेल्या भागधारकांच्या विशेष सर्वसाधारण सभेत संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान संचालक जयवंत नाईक यांचे संचालकपद व संस्थेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.

म्हापसा : गोव्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था धी बार्देस बझार ग्राहक सहकारी संस्थेच्या गुरुवारी घेण्यात आलेल्या भागधारकांच्या विशेष सर्वसाधारण सभेत संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान संचालक जयवंत नाईक यांचे संचालकपद व संस्थेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.म्हापसा अर्बन को आॅपरेटिव्ह बँकेच्या बँक आॅफ गोवाच्या नंदादीप सभागृहात बोलावण्यात आलेल्या या सभेत हा निर्णय घेण्यात आला. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष गुरुदास सावळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. संस्थेचे संचालकपद तसेच सदस्यत्व रद्द का करू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस संचालक मंडळाने संचालक जयवंत नाईक यांना बजावली होती.संस्थेच्या चेअरमनपदावरून संचालक जयवंत नाईक व संचालक मंडळात वाद निर्माण झाला होता. जयवंत नाईक यांना संचालक मंडळाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. सुनावणीनंतर न्यायालयाने संस्थेच्या भागधारकांची विशेष सभा बोलावून निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. दिलेल्या आदेशानुसार ही सभा बोलावण्यात आलेली. त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव दाखल करुन २२ फेब्रुवारीला त्यांना अध्यक्षपदावरुन खाली खेचण्यात आले होते.संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच १६९ सदस्यांनी उपस्थिती लावली होती, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गुरुदास सावळ यांनी पत्रकारांना दिली. सावळ यांनी मांडलेल्या या ठरावाला उपाध्यक्ष डॉ. रवींद्र फोगेरी यांनी अनुमोदन दिले. यावेळी घेण्यात आलेल्या मतदानात हा ठराव १५७ विरुद्ध १२ मतांनी मंजूर करण्यात आला. सहकार कायद्यानुसार एखाद्या सदस्याचे सदस्यत्व रद्द करायचे असल्यास सभेला उपस्थित सदस्यातील एकूण तीन तृतीयांश सदस्यांचे ठरावाला अनुमोदन लाभणे आवश्यक असते. आवश्यकतेपेक्षा जास्त सदस्यांचा पाठिंबा ठरावाला लाभल्याचे सावळ यावेळी पत्रकारांना सांगितले.सभेत काही झालेल्या चर्चेवेळी काही सदस्यांनी जयवंत नाईक यांनी संस्थेला दिलेल्या योगदाना अनुसरून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव मागे घेण्याची विनंती केली होती. केलेल्या विनंतीला अनुसरुन तशी तयारी सुद्धा दाखवून जयवंत नाईक यांनी संस्थे विरोधात विविध न्यायालयात दाखल केलेले खटले मागे घेण्याची अट त्यांना लागू केली आहे. सभेला उपस्थित जयवंत नाईक यांनी खटले मागे घेण्याची भूमिका दर्शवून आपल्याला पुन्हा अध्यक्षपद बहाल करण्यात यावे असे सुचवले. संस्थेचे अध्यक्षपदावर कोणाला नेमावे हा निर्णय संचालक मंडळाचा असल्याने नाईक यांची अट नामंजूर करून ठरावावर शिक्कामोर्तब केले.बार्देश बझार ही गोव्यातील सहकार क्षेत्रातली एक अग्रगण्य संस्था. राज्यभरात त्यांच्या ७ शाखा तसेच १ फार्मसी ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. संस्थेने केलेल्या दाव्यानुसार संस्था सहकार क्षेत्रातील पहिला मॉल उभारण्याच्या मार्गावर असून, पुढील महिन्याच त्याचे कामही सुरू होण्याच्या मार्गावर आहे. गत आर्थिक वर्षात या संस्थेच्या नफ्यात साधारणपणे ३० टक्के वाढही झाली आहे.

टॅग्स :goaगोवा