शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ फेरबदलास थोडा वेळ लागेल, गोविंद गावडेंचे मंत्रिपद काढण्याचा निर्णय माझाच: मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 09:52 IST

एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

 लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मंत्रिमंडळ बदलास थोडा वेळ लागेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, एक मंत्रिपद सध्या रिकामे आहे ते लवकरात लवकर भरावे हा विचार करून सर्व गोष्टी चालल्या आहेत. मी केंद्रीय नेत्यांशी याबाबतीत बोललेलो आहे. योग्यवेळी योग्य ते होईल.

गोविंद गावडे यांना मंत्रि‍पदावरून हटवण्याचा निर्णय मीच घेतला. पक्षशिस्त व इतर गोष्टीही महत्त्वाच्या असतात. गोविंद हे माझे चांगले मित्र आहेत. राज्याच्या हिताने काही निर्णय घ्यावे लागतात. गोविंदशी माझी कोणतीही कटुता नाही. माझ्या बाजूने मी बिल्कुल साफ आहे. गोविंद आजही त्यांचे काही काम असले तर मला सांगतात आणि मी ते करतो.' गोविंद यांना मंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय कठीण गेला का? या प्रश्नावर ते बोलत होते.

मंत्रिमंडळ हे बाराजणांच्या क्रिकेट टीमसारखे आहे. ज्याला बॅटिंग करायला दिली तो प्रसंगी सेंच्युरीही मारतो. परंतु बाराव्या खेळाडूला संधी मिळाली नाही म्हणून तो निष्क्रिय असे म्हणता येणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीतच आरक्षण?

एसटींना निवडणुकीत आरक्षण देण्याबाबतची प्रक्रिया वेगाने झाली तर कदाचित २०२७ च्या निवडणुकीतही ते मिळू शकते. २०२७ मध्ये जनगणना होणार आहे. मतदारसंघांची फेररचना २०२७ नंतरच होणार आहे. ही प्रक्रिया जर लवकर झाली तर कदाचित लवकरही आरक्षण मिळू शकते.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'आदिवासींसाठी भाजप सरकारने अनेक गोष्टी केलेल्या आहेत. मी मुख्यमंत्री होण्यापूर्वी वननिवासी हक्क कायद्याखाली एकालाही सनद मिळाली नव्हती. आता २८०० सनदा या लोकांना बहाल केल्या. येत्या १९ डिसेंबर पूर्वी जास्तीत जास्त अर्ज निकालात काढले जातील.'

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाPoliticsराजकारण