लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील १४ वेगवेगळ्या पंचायतींच्या १४ प्रभागांसाठी ८ मार्च रोजी पोटनिवडणूक होईल, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. यासाठीची मतमोजणी ९ मार्च रोजी होईल.
पेडणे तालुक्यातील चांदेल हसापूर पंचायतीचा प्रभाग १, मांद्रे पंचायतीचा प्रभाग ४, डिचोली तालुक्यातील पिळगाव पंचायतीचा प्रभाग ७ व लाटंबार्से पंचायतीचा प्रभाग 3, बार्देश तालुक्यातील पिळर्ण मार्रा पंचायतीचा प्रभाग १, शिरसई पंचायतीचा प्रभाग ६, साल्वादोर द मुंद पंचायतीचा प्रभाग २, कांदोळी पंचायतीचा प्रभाग १, सासष्टी तालुक्यातील आकें बायश पंचायतीचा प्रभाग ६, फोंडा तालुक्यातील बोरी पंचायतीचा प्रभाग १, वेलिंग प्रियोळ कुंकळ्ळी पंचायतीचा प्रभाग ३, भोम अडकोण पंचायतीचा प्रभाग ३, केपे तालुक्यातील बाळ्ळी अडणे पंचायतीचा प्रभाग ८ व काणकोण तालुक्यातील लोलयें-पोळे पंचायतीचा प्रभाग ८ यासाठी ही पोटनिवडणूक होईल.
Web Summary : Goa's State Election Commission announced by-elections for 14 panchayat wards on March 8th. Counting will occur on March 9th. The election spans across various talukas, including Pedne, Dicholi, Bardez, Salcete, Ponda, Quepem, and Canacona, impacting multiple village panchayats.
Web Summary : गोवा राज्य चुनाव आयोग ने 8 मार्च को 14 पंचायत वार्डों के लिए उपचुनाव की घोषणा की। मतगणना 9 मार्च को होगी। चुनाव पेडने, डिचोली, बारदेज़, सालसेट, पोंडा, केपेम और कानाकोना सहित विभिन्न तालुकाओं में होगा।