शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात बायोगॅसवर धावणार बसगाड्या, देशातील पहिला प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 21:35 IST

बायोगॅसचा इंधन म्हणून वापर करुन त्यावर चालणा-या बसगाड्यांचा देशातील पहिला प्रयोग गोव्यात होत आहे. कदंब महामंडळाने स्वीडनच्या स्कॅनिया या कंपनीशी हातमिळवणी केली असून बायोगॅसवर चालणारी एक आणि बायो इथॅनॉलवर चालणा-या दोन बसगाड्यांचा शुभारंभ राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्या हस्ते उद्या स्वातंत्र्यदिनी होणार आहे.

पणजी, दि. 14 - बायोगॅसचा इंधन म्हणून वापर करुन त्यावर चालणा-या बसगाड्यांचा देशातील पहिला प्रयोग गोव्यात होत आहे. कदंब महामंडळाने स्वीडनच्या स्कॅनिया या कंपनीशी हातमिळवणी केली असून बायोगॅसवर चालणारी एक आणि बायो इथॅनॉलवर चालणा-या दोन बसगाड्यांचा शुभारंभ राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्या हस्ते उद्या स्वातंत्र्यदिनी होणार आहे. या बसगाड्यांचा प्रयोग यशस्वी झाल्यास प्रदूषण निर्मूलनाच्यादृष्टिने तो मैलाचा दगड ठरणार आहे. कदंब महामंडळाचे वाहतूक सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी या बसगाड्यांबाबत अनेक वैशिष्ट्ये सांगितली. याच कंपनीच्या बायो इथॅनॉलवर चालणा-या बसेस सध्या नागपूर महापालिकेच्या ताफ्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. पूर्णपणे वातानुकुलीत असलेली ही बस ३७ आसनी असून इंजिन मागील बाजूस आहे. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आणि जीपीएस सिस्टम असल्याने बस नेमकी कुठे आहे हे ट्रॅक केले जाऊ शकते. या बसचे खास वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांगांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये चढण्या-उतरण्यासाठी सोयीचे व्हावे याकरिता अशी व्यवस्था आहे की बसचे फ्लोरिंग खाली घेता येते. गतिरोधक आला किंवा रस्त्यावर पावसाचे पाणी साचलेले असल्यास फ्लोरिंग एक फूट वर घेता येते. साधारणपणे एक टन कच-यापासून २५ क्युबिक मिटर बायोगॅस तयार होतो. प्रती क्युबिक मिटर साधारणपणे अडीच किलोमिटर बस धावू शकते. याचाच अर्थ २५ क्युबिक मिटर गॅस इंधन म्हणून वापरला तर त्यातून ६0 ते ६२ किलोमिटर मायलेज मिळू शकते. कदंब महामंडळाच्या ताफ्यात सध्या ५00 हून अधिक बसगाड्या आहेत.