शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

दाबोळी जंक्शनसमोरील महामार्गावर बस आणि ट्रकचा अपघात, 4 जण जखमी

By पंकज शेट्ये | Updated: October 12, 2023 19:06 IST

एक खासगी प्रवासी मिनीबस सुमारे २० प्रवाशांना घेऊन मडगावहून वास्कोच्या दिशेने येत होती.

वास्को: गुरूवारी (दि.१२) दाबोळी जंक्शनसमोरील महामार्गावर दोन प्रवासी बस आणि एक पार्क करून ठेवलेल्या ट्रक यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात चार प्रवासी जखमी झाले. जखमी झालेल्या प्रवाशात तीन महीला आणि एका पुरूषाचा समावेश असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले.

वास्को पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार सकाळी ११.३० वाजता अपघात घडला. एक खासगी प्रवासी मिनीबस सुमारे २० प्रवाशांना घेऊन मडगावहून वास्कोच्या दिशेने येत होती. ती बस जेव्हा वालीस जंक्शनकडून दाबोळी जंक्शनच्या महामार्गावर पोचली त्यावेळी कदंब महामंडळाच्या प्रवासी बसने तिला ‘ऑव्हरटॅक’ करण्याचा प्रयत्न केला. कदंब महामंडळाच्या बस चालकाने जेव्हा मिनी बसला ‘ऑव्हरटॅक’ करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दोन्ही धावत्या बसचा एकमेकाला स्पर्श झाला. ‘ऑव्हरटॅक’ करणारी कदंब बस आपल्या मिनी बसला धडकणार असल्याचे चालकाला दिसताच त्यांनी बस डाव्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केला. कदंब बस आणि मिनि बसची जोरात होणारी धडक वाचवण्यासाठी खासगी बस चालकाने बस डाव्या बाजूने घेतली असता त्याला समोर रस्त्यावर एक ट्रक पार्क असल्याचे दिसून आले.

चालकाने पार्क ट्रकला बसची धडक होण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले, मात्र खासगी मिनी बसची धडक जाऊन पार्क ट्रकवर बसली. त्या अपघातात खासगी मिनी बसमध्ये प्रवास करणाऱ्या तीन महीला आणि एक पुरूष जखमी झाला. जखमी झालेल्या कुंदा विरनोडकर (वय ५४, रा: मडगाव), मंजूळा पाटील (वय २७ष रा: नवेवाडे - वास्को), अवरल सोझा (वय ३६, बोगदा - मुरगाव) आणि अरवींद कुमार (वय २३, रा: सडा) यांना त्वरित उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. त्या अपघातात चौंघांनाही झालेल्या जखमा कीरकोळ असल्याने त्यांच्यावर उपचार करून नंतर त्यांना घरी पाठवले.वास्को पोलीसांना अपघाताची माहीती मिळातच त्यांनी त्वरित तेथे दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला. तसेच पोलीसांनी अपघाताचे प्रकरण नोंद केले असून पोलीस हवालदार संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.

टॅग्स :Accidentअपघातgoaगोवा