लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: गोव्याच्या सर्व घटकांचा विचार करून सर्वसमावेशक आणि दर्जेदार अर्थसंकल्प सादर करण्याचा आपण सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ३३ टक्के जेंडर बजेटची तरतूद ही महत्त्वाचे पाऊल ठरल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीत सांगितले. या उपक्रमाची संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महिला विभागानेही दखल घेत अभिनंदन केल्याचे त्यांनी नमूद केले.
साखळी येथील रवींद्र भवनमध्ये गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि रवींद्र भवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अर्थसंकल्पावर विशेष परिसंवादात ते बोलत होते.
आर्थिक व्यवस्थापनाच्या बाबतीत गोवा देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला. जागतिक स्तरावर निर्माण होत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करूनच अर्थसंकल्पाचा आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात या परिस्थितीचा आर्थिक परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रतिमा धोंड, डॉ. मनोज कामत, डॉ. शेखर साळकर, नामदेव गावस, रोहन भंडारी, वरद सामंत आदी तज्ज्ञांनी अर्थसंकल्पावर आपापली मते मांडली. प्रतिमा धोंड यांनी हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून, महिला सक्षमीकरण, स्टार्टअप, पर्यटन, कृषी आणि संस्कृतीला चालना देणारा असल्याचे सांगितले.
सकारात्मक परिणाम लवकरच दिसणार
पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, कृषी, उद्योग, पर्यटन, खाण आणि दळणवळण अशा सर्व क्षेत्रांचा सर्वंकष विचार करून अर्थसंकल्पात आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्याला स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने विविध योजना राबविण्यात येत असून, त्याचे सकारात्मक परिणाम गेल्या काही वर्षांत दिसून येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Web Summary : Goa's budget prioritizes inclusive growth, especially women's empowerment with 33% gender budgeting. CM Sawant emphasized economic strength despite global challenges. Experts lauded the budget's focus on startups, tourism, agriculture, and culture. Infrastructure and self-reliance initiatives are showing positive results.
Web Summary : गोवा का बजट समावेशी विकास पर केंद्रित है, खासकर महिलाओं के सशक्तिकरण पर, जिसमें 33% जेंडर बजटिंग है। मुख्यमंत्री सावंत ने वैश्विक चुनौतियों के बावजूद आर्थिक मजबूती पर जोर दिया। विशेषज्ञों ने स्टार्टअप, पर्यटन, कृषि और संस्कृति पर बजट के फोकस की सराहना की। बुनियादी ढांचा और आत्मनिर्भरता पहल सकारात्मक परिणाम दिखा रही हैं।