शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात ब्रिटिश महिलेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 08:26 IST

संशयित जेरबंद : अन्य एका घरफोडी प्रकरणातही सहभाग

मडगाव/काणकोण : काणकोण रेल्वेस्थानकावरून निघालेल्या ४८ वर्षीय ब्रिटिश महिलेवर गुरुवारी पहाटे बलात्कार करण्यात आला. गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संशयित मडगाव रेल्वेस्थानक परिसरात सापडला. बलात्कारानंतर पोलिसांनी त्याला अटक केली; पण बलात्कारात त्याचा सहभाग आहे हे समजण्यासाठी सात तास जावे लागले.

संशयिताचे नाव रामचंद्रन (३०) असे असून तो तामिळनाडूतील तंजावरचा आहे. अन्य एका चोरीच्या प्रकरणात मडगाव रेल्वेस्थानकाच्या परिसरात त्याला पकडल्यानंतर काणकोणच्याही बलात्कारात आपला हात असल्याचे त्याने कबूल केले. आरोपीने घातलेल्या जाकीटवरून पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी या गुन्ह्याबद्दल चौकशी केली असता धागेदोरे सापडले. संशयिताकडे त्या ब्रिटिश महिलेच्या मालकीचा कॅमेराही सापडला. काणकोणच्या पाळोळे समुद्र किनाऱ्यावर उतरलेली ही ब्रिटिश महिला पहाटे चारच्या सुमारास रेल्वेस्थानकावर आली होती. रेल्वे यायला उशीर आहे हे समजल्यावर ती परतत असताना तिच्यावर बलात्कार झाला. त्यानंतर त्या इसमाने तिच्या बॅगेत असलेले २० हजार रुपये घेऊन पळ काढला.सीसीटीव्हीमुळे पटली ओळखपेडणे पोलीस घरफोडीच्या प्रकरणात फरारी आरोपीच्या शोधात मडगाव रेल्वेस्थानक परिसरात आले असता, फोनच्या लोकेशनवरून हा संशयित त्यांच्या तावडीत सापडला. त्या ब्रिटिश महिलेवर बलात्कार केल्याचा संशय असलेल्या आणि सीसीटीव्ही कॅमेºयात छबी टिपल्या गेलेल्या संशयिताच्या अंगावरील जाकीट आणि पकडलेल्या संशयिताच्या अंगावरील जाकीट एकाच प्रकारचे असल्याने पोलिसांनी या बलात्कार प्रकरणाबद्दलही चौकशी सुरू केल्यानंतर संशयिताने गुन्हा कबूल केला.

टॅग्स :goaगोवाRapeबलात्कार