शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या काजूची ब्रॅँडिंग हाेणे गरजेचे, मुख्यमंत्र्यांचे आंतराष्ट्रीय काजू परिषदेत उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 17:16 IST

...त्यामुळे गाेमंतकीय काजूची खास ब्रॅँडिंग हाेणे गरजेचे आहे, असे मख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

नारायण गावस -पणजी: राज्यातील काही कारखानदार आफ्रिकन देशातील कमी दरात मिळत असलेल्या काजू बिया आणून गोवन काजू म्हणून विकले जात आहे. त्यामुळे अस्सल गोमंतकीय शेतकऱ्यांच्या काजू बियांना चांगला दर मिळत नाही. त्यामुळे गाेमंतकीय काजूची खास ब्रॅँडिंग हाेणे गरजेचे आहे, असे मख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

काजू आणि कोको विकास संचालनालय, कोची (केरळ) व कृषी संचालनालय (गोवा), गोवा फलोत्पादन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन दोनापावला येथे आयोजित केलेल्या काजूवर आधारित राष्ट्रीय परिषदच्या उद्घाटनाला प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते या परिषदेत उद्घाटन करण्यात आले. रविवारीही काजू विषयावर चर्चा सत्र होणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले गोव्याचा काजू हा आंतराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. राज्यात काजू उत्पादन वाढावे यासाठी आम्ही विविध याेजना देत असतो. तसेच शेतकऱ्यांसाठी खास आधारभूत किमतही दिली जाते. पण आता राज्यात आफ्रिकन काजू आणून तो गाेवन काजू म्हणून विकला जात आहे. त्यासाठी आता खास गाेमंतकीय काजूचे ब्रॅडिंग होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, काजू पासून बनविल्या जाणाऱ्या फेणीला जीआय टॅग मिळाला आहे तसेच आता हुर्राक आणि काजू गरालाही जीआय टॅग मिळणार आहे. यामुळे गाेव्याची काजू फेणी जगभर प्रसिद्ध झाली आहे. काजू गर प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

'काजूचे सक्षम उत्पादन' ही परिषदेची संकल्पना आहे. काजू उत्पादन वाढ आणि त्यासमोरील आव्हाने हा परिषदेचा प्रमुख विषय आहे. या परिषदेला देशभरातून सुमारे २५० ते ३०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. काजू विषयावर विविध चर्चासत्राचा त्या घेतली जात आहेत. त्यासाठी काजू क्षेत्रातील मान्यवरांना पाचारण करण्यात आले असून त्यांची व्याख्याने व मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत आहे.गोवा राज्यात काजू हे प्रमुख पीक असून अनेक शेतकरी त्या पिकावर अवलंबून आहेत. ग्रामीण भागात तर अनेक कुटुंबे काजूवर अवलंबून आहेत. गोव्यातील काजू शेतकऱ्यांनी या परिषदेस हजेरी लावावी असे आवाहन कृषी खाते संचालक संदीप फळदेसाई यांनी केले आहे. 'काजूचे सक्षम उत्पादन' ही परिषदेची संकल्पना आहे. 

टॅग्स :goaगोवा