शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांची मोडतोड : सबळ पुराव्याअभावी बॉयची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 18:06 IST

धार्मिक स्थळांच्या मोडतोड प्रकरणातून धडाधड सुटत असलेला फ्रान्सिस्क परेरा उर्फ बॉय हा लोटली क्रॉस तोडफोड प्रकरणातूनही निर्दोष मुक्त झाला. त्याच्या विरोधात कुठलाही सबळ पुरावा कोर्टासमोर आणण्यास मायणा-कुडतरी पोलिसांना अपयश आल्याने मडगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सई प्रभूदेसाई यांनी त्याला आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्तता केली. 

मडगाव :  धार्मिक स्थळांच्या मोडतोड प्रकरणातून धडाधड सुटत असलेला फ्रान्सिस्क परेरा उर्फ बॉय हा लोटली क्रॉस तोडफोड प्रकरणातूनही निर्दोष मुक्त झाला. त्याच्या विरोधात कुठलाही सबळ पुरावा कोर्टासमोर आणण्यास मायणा-कुडतरी पोलिसांना अपयश आल्याने मडगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सई प्रभूदेसाई यांनी त्याला आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्तता केली. आतापर्यंत फ्रान्सिस्क परेरा दहा प्रकरणांतून निर्दोष मुक्त झालेला असून अजुनही दक्षिण गोव्यातील चार न्यायालयात त्याच्या विरोधात आणखी पाच खटले प्रलंबित आहेत. या दहाव्या प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यावर संशयित बॉय हसत हसत न्यायालयाच्या बाहेर आला.कारवोता-लोटली येथील क्रिस्टल रॉकजवळ असलेल्या बॉ जिजस क्रॉसची 13 जुलै 2017 रोजी मोडतोड करण्यात आली होती. मायणा कुडतरी पोलिसांनी नंतर या प्रक़रणात संशयिताला अटक केली होती. सदर संशयिताने हातोडय़ाने या क्रॉसवर प्रहार करुन त्याची मोडतोड करुन धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र या प्रकरणात पोलीस  कुठलाही पुरावा न्यायालयासमोर आणू शकले नाहीत. या  प्रकरणात संशयिताच्यावतीने अॅड. समीर देसाई यांनी बाजू मांडली.जून व जुलै या दोन महिन्यात दक्षिण गोव्यात लागोपाठ धार्मिक स्थळांची मोडतोड होण्याच्या घटना घडत होत्या. या प्रक़रणात नंतर कुडचडे पोलिसांनी व्यवसायाने टॅक्सी ड्रायव्हर असलेल्या या बॉयला अटक केली होती. पोलिसांच्या दाव्याप्रमाणो रात्रीच्यावेळी भाडी घेऊन जाताना येताना सदर संशयित रस्त्याच्या बाजूला असलेल्या धार्मिक स्थळांची मोडतोड करत होता. पुतळे व क्रॉसमध्ये वाईट शक्ती लपलेल्या असतात असा वहिम असल्यामुळे या शक्तींना मुक्त करण्याच्या उद्देशाने तो ही कृत्ये करायचा असा खुलासा नंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या विधानसभेत केला होता. मागच्या बारा वर्षात या बॉयने संपूर्ण गोव्यात अशाप्रकारे दीडशेपेक्षा अधिक धार्मिक स्थळांची मोडतोड केल्याचा आरोप त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर ठेवला होता. 

टॅग्स :goaगोवा