शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बोरकरांच्या कवितांनी प्रेमकवितेलासुद्धा अध्यात्मिक मांगल्य दिले - प्रवीण दवणे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 16:42 IST

संमेलनात महाराष्ट्रासह आलेल्या विविध कवींसह गोमंतकीय कवींनी संमेलनात चांगलाच रंग भरला.

फोंडा : ‘कविवर्य बा. भ. बोरकर यांच्याकडून कानांचं श्रवण केलं जातं, डोळ्यांची दृष्टी केली जाते आणि देहांचा आत्मा केला जातो म्हणून त्यांची कविता श्रेष्ठ ठरते. बोरकर समजून घ्यायचे असतील तर त्यांच्या कवितेला असलेली अध्यात्मिक बैठकसुद्धा समजून घेतली पाहिजे. प्रेम कवितेलासुद्धा आध्यात्मिक मांगल्य देण्याचे सामर्थ्य त्यांच्या कवितेत आहे’ अशा शब्दात ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांनी बोरकर यांच्या कवितेवर भाष्य केले. 

कोकण मराठी परिषद (गोवा) च्या वतीने रविवारी सकाळी बोरी येथील नवदुर्गा मंदिराच्या प्रांगणात आयोजित अठराव्या शेकोटी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रवीण दवणे म्हणाले, ‘बोरकरांना पहिली कविता देवाच्या गाभाऱ्यात सुचली. म्हणूनच नंतर त्यांच्या कवितेचा गाभारा झालेला आम्ही सर्वांनी पाहिला. मरणाचासुद्धा महोत्सव करायचा असतो हे बोरकर आम्हाला शिकवतात. म्हणूनच पानगळसुद्धा ते आनंदाने स्वीकारतात. जीवन समृद्ध करायचे असेल तर त्यांचा हा विचार आम्ही आत्मसात करायला हवा. बोरकरांची कविता म्हणजे जगण्याचा रियाज आहे.’

रंगले कवी संमेलनसंमेलनात महाराष्ट्रासह आलेल्या विविध कवींसह गोमंतकीय कवींनी संमेलनात चांगलाच रंग भरला. जयसिंगपूर येथील प्रा.सुनंदा शेळके यांच्या अध्यक्षतेखाली सदर कवी संमेलन पार पडले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन नारायण महाले व चित्रा क्षीरसागर यांनी केले. संमेलनात नंदिनी कुलकर्णी, चित्रा क्षीरसागर, पद्माकर कुलकर्णी ( सोलापूर) , संजय पाटील, अशोक लोटलीकर, रेखा डायस, मेघना कुरुंदवाडकर, दया मित्रगोत्री, लक्ष्मण पित्रे, प्रकाश क्षीरसागर, प्रमोद कारापूरकर, मोहनराव कुलकर्णी, डॉ. बसवेश्वर चेणगे (कराड), प्रा. प्रकाश जडे ( मंगळवेढा). 

चार पुस्तकांचे प्रकाशन चार पुस्तकांचे प्रकाशन रविवारी सकाळी झाले. वैशाली सूर्यवंशी यांचे ‘ड्यानीच्या दिशा आणि इतर गोष्टी’, मेघना कुरुंदवाडकर यांचे ‘आठवणीचा झुला’, गुरुदास नाटेकर यांचे ‘विचारधन’, ज. अ. रेडकर यांचे ‘चिमणीचं घरटं’ या चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनाध्यक्ष प्रवीण दवणे, डॉ. सोमनाथ कोमरपंत, रमाकांत खलप, सागर जावडेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवा