शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोलवाळ येथे बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; अमेरिकनना गंडविणारी ३३ जणांची टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 09:25 IST

क्राईम ब्रँचची मोठी कारवाई; २६ संगणक, मोबाईल जप्त : ‘अमेझॉन कॉल सेंटर' नावाने सुरू होते.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: अमेरिकन लोकांना गंडविणाऱ्या ३३ जणांची टोळी क्राईम बँचने पकडली आहे. कोलवाळ येथे 'अमेझॉन कॉल सेंटर'च्या नावे सुरू असणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून हे मोठे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. सोमवारी मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात क्राईम ब्रँचकडून १५ पुरुष आणि ८ महिला मिळून एकूण ३३ जणांना अटक केली आहे. या कार्यालयातील २६ संगणक, मोबाईल, राउटर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.

कोलवाळ येथील 'कविश रेसिडेन्सी' या इमारतीच्या तळघरात हे बोगस कॉल सेंटर थाटले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मंडळी दोन महिन्यांपूर्वीच इथे आली होती आणि दोन महिन्यांपासून हे कॉलसेंटर सुरू करण्यात आले होते. अटक करण्यात आलेले सर्वजण गोव्याबाहेरील असून त्यात गुजरात, मिझोराम, छत्तीसगड, दिल्ली या राज्यातीलही आहेत. केवळ अमेरिकन लोकांना लक्ष्य करून त्यांना आर्थिक गंडा घालण्याचे काम या बोगस कॉल सेंटरमध्ये चालले होते, अशी माहिती क्राईम ब्रँचचे अधीक्षक निधीन वालसान यांनी दिली.

अटक करण्यात आलेले ठकसेन 

जिगर परमार, नरेंद्रसिंग राठोड (गुजरात), अभिनव सिंग, नेहा कोथेकर, गिरीश खरात, प्रतीक चव्हाण, शाहरुख हुसेन, अमीर शेख (महाराष्ट्र), अजुंग रोकने (गुवाहाटी), सेम्युअल सायलो (मिझोराम), सिम्लेश फर्नांडिस, रोनाल्ड नॉग्लान, अँडर्सन मार्विन, बारी रिचर्ड, शेलॉन सोहतुम, मंगकरा मग्रुम, पैला मरिंग, संजना शाह, जेसिका खियांते, क्रीस डिसोझा, ज्युनेद अक्रम अली, जिप्सांग लिंगडोह, डेम दुनाई, पीटर राऊटे, (मेघालय), पाप्पा दास (आसाम), यापन्न शेरॉन, टी थांखान्सू (मणिपूर), थांग्लीस संथम, किंग वांग्ली, लेम शॉपिंग, मिमि नॉक्लांग, अरिम जमीर, (नागालँड), लालबियाक मावी (मिझोरम), अशी त्यांची नावे आहेत.

अशी करायचे फसवणूक

- संशयितांनी अमेझॉन या शॉपिंग अॅपवरून विविध मार्गांनी अमेरिकन खातेदारांची माहिती मिळविली होती. त्यात मोबाईल क्रमांकासह बँक संबंधित माहितीही होती.- ही ठकसेन मंडळी अमेरिकन नागरिकांना फोन करून सांगायचे की, त्यांच्या अमेझॉन खात्यावरून महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ऑर्डर करण्यात आली आहे.- जेव्हा खातेदार आपण कोणतीही ऑर्डर केलेली नाही, असे सांगायचा तेव्हा तुमचे खाते कुणी तरी हॅक केले असावे असे सांगून त्यांना घाबरावयाचे. त्यानंतर त्यांना मदत करण्याचे सांगून एका खात्यात पैसे जमा करायला सांगायचे जे पैसे या ठकांच्या खात्यात जायचे.- या संदर्भात अमेरिकन लोकांनी तक्रारी केल्या तेव्हा चौकशी झाली आणि फोन गोव्यातून येत असल्याचे आयपी क्रमांका वरून स्पष्ट झाले.- गोवा पोलिसांना याची माहिती देण्यात आल्यानंतर क्राईम ब्रँचचे निरीक्षक नारायण चिमुलकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करून या बोगस कॉल सेंटर- वाल्यांचा खेळ संपविण्यात आला.

गोवाच का?

अमेरिकन लोकांना टोपी घालण्याची हौस असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना त्यासाठी गोवाच का सापडतो हा चर्चेचा विषय बनला आहे. कारण यापूर्वीही असे दोन प्रकार घडले होते, त्यात बिगर गोमंतकीय यांनी गोव्यात येऊन अमेरिकन नागरिकांनाच फसविण्यासाठी कॉल सेंटर सुरु करण्यात आले होते.

कॉल सेंटरवर केलेली कारवाई ही चांगली गोष्ट आहे. पण त्या कॉल सेंटरशी आपले नाव जोडणे चुकीचे आहे. त्याच्याशी आपला कोणताच संबंध नाही. आपण ही जागा भाडेपट्टीवर ऑगस्ट महिन्यात दिली होती. त्यासंबंधीचा करारही केला होता. त्यांच्याकडून वेळेवर भाडेही दिले जात होते. मात्र, जो व्यक्ती बनावट कॉल सेंटर चालवत होता, त्यांचे नाव केलेल्या कारवाईतून समोर येणे गरजेचे आहे. - अँड. तारक आरोलकर, नगरसेवक, म्हापसा.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी