शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

तुये सिमेंट ब्लॉक तयार करणाऱ्या कंपनीत बॉयलर गॅसचा भीषण स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 22:07 IST

तुये येथील नवीन विस्तारित औद्योगिक वासाहतीतील मेसर्स राजेंद्र काशीनाथ जोशी यांच्या मालकीच्या सिमेंट ब्लॉक तयार करणा-या फॅक्टरीमध्ये आज सव्वाबारा रोजी भीषण गॅस बॉयलर यांचा स्फोट झाला

म्हापसा : तुये येथील नवीन विस्तारित औद्योगिक वासाहतीतील मेसर्स राजेंद्र काशीनाथ जोशी यांच्या मालकीच्या सिमेंट ब्लॉक तयार करणा-या फॅक्टरीमध्ये आज सव्वाबारा रोजी भीषण गॅस बॉयलर यांचा स्फोट होऊन अखिल भानुदास नाईक (२५), श्री अजित व रमजान अली हे तिघे कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना गोवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.बॉयलरचे भले मोठे पाईपचा एवढा स्फोट होता की या पाईपने गेट समोर पार्क करून ठेवलेल्या मालवाहू ट्रकच्या समोरील केबिनचा पूर्ण भाग नष्ट करीत समोरील दुस-या कंपनीच्या समोर हृुंदाई वाहन पार्क केले होते, त्या कंपनीच्या दगडी कुंपणाला भेदून वाहनांची नासधूस करत ८०० मीटर रस्ता ओलांडून हे पाईप जंगलात स्थिरावले. या भीषण स्फोटाची तीव्रता एवढी दूरपर्यंत पोचली होती १० किलोमीटर पर्यंत गाव आणि लोकवस्ती हादरली.  कुठे भीषण स्फोट झाला त्या दिशेने नागरिक धावत होते. मात्र सर्वात प्रथम धावून आले ते सरपंच निलेश कांदोळकर व पंच आनंद साळगावकर घटनास्थळी पोचले. त्यावेळी आणखी कुणीही नव्हता, मालकही जाग्यावर नव्हता. लगेच सरपंच निलेश कांदोळकर यांनी अग्निशमन दल, पोलीस आणि १०८ वाहनाला माहिती दिली. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना १०८ वाहनांमध्ये हलवले, मात्र कुणीही अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही.

सविस्तर माहिती नुसार तुये औद्योगिक वसाहतीतील नवीन विस्तारित औद्योगिक वसाहतीत पहिल्या टप्प्यात एकूण ४५ कंपन्या आहेत. दुसºया टप्प्यात ८ कंपन्या आहेत. त्यातील दोन कंपन्या कार्यरत आहेत त्यातील मेसर्स राजेंद्र काशीनाथ जोशी यांच्या कंपनीने एकूण ९ कामगार सिमेंट ब्लॉक तयार करत होते. त्यातील कंपनीत आज सव्वाबारा वाजता भीषण स्फोट झाला, बॉयलर पाईपचा स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण तुये गाव हादरला.

कंपनीच्या गेटसमोर जीए ०६-२८१९ ट्रक सिमेंट ब्लॉक नेण्यासाठी पार्क करून ठेवला होता व वाहनचालक कुठे तरी दूर गेला होता. त्यामुळे तो वाचला, त्या वाहनांच्या समोरील केबिनचा पूर्ण नासधूस करीत हे पाईप १०० मीटरच्या अंतरावर असलेल्या दुसºया कंपनीचे दगडी कुंपण भेदून त्या ठिकाणी पार्क करून ठेवलेली हृुंदाई एमएच ०९ एक्स १२०९ वाहनाची नासधूस करीत आणखी दुसºया कंपनीची वरच्या मजल्यावर जाण्यासाठी शिडी होती ती मोडीत आणखी एका दगडी कुंपणाला पार करीत रस्ता ओलांडत ८०० मीटर अंतरावर हे भले मोठे पाईप जाऊन जंगलात स्थिरावले.

तिघा जखमींना अगोदर तुये हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले तिने त्यांची गंभीर जखमी पाहून त्यांना बांबोळी येथे उपचारासाठी पाठवले. दोघे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांचा तोंडाला व अंगाला बराच मार लागला आहे.

या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर धाटकर व पराख यांनी पंचनामा केला.

आज शनिवार आणि सेकंड शनिवार असल्याने सुट्टी असल्यामुळे शासकीय अधिकारी घटनास्थळी फिरकले नाही, घटनेचे गांभीर्य तीव्र असतानाही सरकारी यंत्रणा सुस्त असल्याने कुणी फिरकले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

तुयेचे सरपंच निलेश कांदोळकर यांनी घटनास्थळी जखमींना मदत करताना स्थानिक पत्रकारांकडे बोलताना औद्योगिक वसाहती काय चालतय या विषयी पंचायत अभिकज्ञ आहे, औद्योगिक झोन असल्याने पंचायतीकडे या संदर्भात कंपन्यांची माहिती नाही, एखादी भीषण घटना घडली की पंचायतीला धावून यावे लागते किंवा नागरिक पंचायतीला दोषी धरतात असे सरपंच म्हणाले, अधिकारी घटनास्थळी पोचले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :goaगोवा