शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

उत्पल पर्रीकर यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांचा दबाव; पणजीतून लढण्याचा सल्ला, नव्याने गाठीभेटी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 14:31 IST

उत्पल यांनी काल रविवारी अनंत चतुर्थीपासून पणजीत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले. तत्पूर्वी त्यांनी दीड व पाच दिवसांच्या गणेशोत्सवावेळीही पणजीतील निष्ठावान भाजप मतदार व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली.

पणजी : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पूत्र उत्पल पर्रीकर यांनी यावेळी विधानसभा निवडणूक लढवायलाच हवी असा आग्रह पणजीतील अनेक मूळ भाजप कार्यकर्त्यांनी धरला आहे. उत्पल सध्या कार्यकर्त्यांना व भाजपच्या पणजीतील मतदारांना भेटून त्यांचे मत आणि मन जाणून घेत आहेत. उत्पल यांनी काल रविवारी अनंत चतुर्थीपासून पणजीत कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले. तत्पूर्वी त्यांनी दीड व पाच दिवसांच्या गणेशोत्सवावेळीही पणजीतील निष्ठावान भाजप मतदार व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. पणजीतील मतदारांना योग्य असा पर्याय हवा आहे. पणजीत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची घुसमट होत आहे. त्यांना स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्यानंतर योग्य असा प्रतिनिधी लाभलाच नाही. यामुळे त्यांनी उत्पलना ‘तुम्ही यंदा निवडणूक लढवाच’ असा सल्ला देणे सुरू केले आहे. काही कार्यकर्ते तर जास्त आग्रही आहेत.पणजी महापालिका निवडणुकीवेळी काही भाजपनीष्ठांनीच भाजपच्या पेनलमधील उमेदवारांना मते दिली नाहीत. येत्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या तिकीटावर उत्पल यांनी गंभीरपणे दावा करावा व पक्षाने तिकीट दिले नाही तरीदेखील त्यांनी रिंगणात उतरावे असा सल्ला देणारेही कार्यकर्ते आहेत. पण स्वत: उत्पल यांनी तसे काही ठरवलेले नाही. उत्पल यांनी सध्या पणजीतील सर्व लोकांचे मत जाणून घेण्यासाठीच चर्चा चालवली आहे. यापुढे तर ते पणजीतील प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांना गटागटाने भेटतील अशी माहिती मिळाली. उत्पल हे भाजपच्या तिकीटावर दावा करण्यापूर्वी पक्षाच्या काही केंद्रीय नेत्यांनाही भेटणार आहेत. 

मी कार्यकर्त्यांच्या सतत संपर्कात आहे व संवादही साधत आहे. चतुर्थीवेळी मी मळा व अन्य भागांतील बहुतांश भाजप मतदारांच्या घरी गेलो. यापुढे प्रत्येक बुथनिहाय मी गाठीभेटी वाढवीन. योग्यवेळी योग्य तो निर्णय होईल. कार्यकर्ते आग्रह करतात, ही गोष्ट खरी आहे.- उत्पल पर्रीकर 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाBJPभाजपाElectionनिवडणूक