शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून महिला केंद्रीत योजना: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 15:32 IST

म्हापसा येथे महिला मोर्चातर्फे पश्चिम विभागाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने खऱ्या अर्थाने महिला केंद्रित योजना राबविल्या. महिलांना आत्मनिर्भर बनविण्यापासून, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम भाजपानेच केले. लोकसभा व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे नारीशक्ती वंदन अधिनियम-२०२३ हे दुरुस्ती विधेयक असो किंवा तीन तलाक विधेयक आणून मोदी सरकारनेच महिलांना आत्मसन्मान व न्याय देण्याचे काम केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

मंगळवारी (ता.१२) म्हापसा येथील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात महिला मोर्चातर्फे पश्चिम विभागासाठी बैठक आयोजित केली होती. यामध्ये गोवा, महाराष्ट्र, दमण, गुजरात व मुंबईच्या महिला मोर्चा अध्यक्षा, सचिव तसेच पदाधिकाऱ्यांसाठी ही बैठक होती.

या बैठकीतून आगामी लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी महिलांसाठी कशा प्रकारे नियोजन आराखडा असावा, यादृष्टीने विचारविनिमय यावेळी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला पदाधिकारी सोनाली मोहिले यांना भाजपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पक्षप्रवेश देण्यात आला. यावेळी महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सरचिटणीस दीप्ती रावत, गोवा महिला मोर्चा अध्यक्षा सुलक्षणा सावंत, महाराष्ट्राच्या चित्रा वाघ, दमणच्या सिंपल कटेला, गुजरातच्या दीपिका सरदवा, मुंबईच्या शीतल गंभीर देसाई, तसेच आरती बांदोडकर या व्यासपीठावर उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले की, मोदी सरकारने वेळोवेळी महिला केंद्रीय योजना राबवून महिलांना ताठ मानेने जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित केले. यापूर्वी काँग्रेस सरकारच्या ७० वर्षांत हे कधीच झाले नसल्याची टीका त्यांनी केली. याशिवाय येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील महिला बचत गटांसाठी असलेला फिरणारा निधी वितरित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

'नारीशक्ती वंदन'ची अंमलबजावणी निवडणुकीनंतर

चित्रा वाघ म्हणाल्या की, मोदी सरकारने महिलांसाठी नारीशक्ती वंदन अधिनियम हे विधेयक आणले असून, आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर याची अंमलबजावणी देशभर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे, महागाईचा मुद्दा हा फक्त राजकीय मुद्दा असून विरोधकांकडून त्याचा वापर केला जातोय, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत