शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भाजप प्रशिक्षण शिबिराचा घेतला नगसेवकांनी लाभ: राज्यभरातील नगरसेवकांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 14:17 IST

नारायण गावस पणजी: राज्यातील सर्व  नगरसेेवकांनी आपल्या प्रभागातील लोकांना सरकारी सेवांचा लाभ करुन द्यावा तसेच आपल्या प्रभागाचा कशा प्रकारे ...

नारायण गावस

पणजी: राज्यातील सर्व  नगरसेेवकांनी आपल्या प्रभागातील लोकांना सरकारी सेवांचा लाभ करुन द्यावा तसेच आपल्या प्रभागाचा कशा प्रकारे विकास करावा अशा विविध विषयांवर गोवा भाजप पक्षातर्फे नगरपालिका सदस्य प्रशिक्षण कार्यशाळा पणजीत  आयाेजित केली होती. या प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनाला राज्यसभेचे खासदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित  होते.  या कार्यशाळेत मंत्री सुभाष शिरोडकर, रवी साठे, भाजपचे नेते ॲड. नरेंद्र सावईकर, गाेविंद पर्वतकर, सर्वानंद भगत अशा विविध पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले.

- नगरसेवकांनी प्रभागाचा प्रोफाईल करावा

  प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागाचा प्रोफाईल करणे गरजेचे आहे. आपल्या प्रभागात किती घरे आहेत? किती घरांमध्ये किती लोक राहतात? कुणाच्या घरात सरकारी नाही याचा तपशील घ्यावा.  तसेच ज्या लोकांना सरकारच्या योजना मिळत नाही अशा लोकांना या योजनांचा लाभ मिळवून द्यावा. अशी विविध कामे केली तरी आपला प्रभाग मजबूत करु शकतात. मी माझ्या  मतदारसंघाचा सर्व प्रकारचा तपशील ठेवत आहे. मला माझ्या मतदारसंघातील प्रत्येक घराची माहिती आहे. नगरसेवकांनी अशाच प्रकारे माहिती ठेवणे गरजेचे आहे, असे  सहकार मंत्री सुभाष शिराेडकर यांनी सांगितले.

जनतेच्या बळावर आपण आज या पदावर पाेहचलो याचे  भान  ठेवावे. अशा  विविध उपक्रमातून ज्ञान मिळत असते. नगरसेवकांना या ज्ञानाचा फायदा घेऊन आपल्या प्रभागामध्ये  विकास करावा. या प्रशिक्षणाचा तुम्हाला नक्कीच लाभ मिळत आहे. चांगले प्रशिक्षण हे नेहमी जीवनशैलीत बदल करत असते.  एक नगरसेवक म्हणून निवडून येणे साेपी गाेष्ट नसते. यासाठी लोकांची मन जिंकणे गरजेचे आहे, असे मंत्री सुभाष शिराेडकर म्हणाले.

   प्रत्येक वर्षी भाजप असे प्रशिक्षण शिबिर राबवित असते. यातून नगरसेवकांचा  विकास होतो. तसेच त्यांना आपल्या लोकांशी कशा  प्रकारे संवाद साधावा याची माहिती मिळते. राज्यभरात ज्या नगरसेवकांनी सहभाग घेतला त्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. मुख्यमंत्री मध्यप्रदेशमध्ये हाेणाऱ्या निवडणूकांच्या प्रचारात व्यस्थ असल्याने उपस्थित राहू शकले नाही. तरीही इतर मार्गदर्शकांचे चांगले मार्गदशन लाभणार. या शिबिरात तुमचा मानसिक विकास होणार आहे. राजकारणाचे मूळ समजणार आहे, असे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी  सांगितले.