शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात घटक पक्षांच्या धमक्यांमुळे भाजप आश्चर्यचकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 12:46 IST

भाजपप्रणीत आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या विधानांमुळे व विविध मतदारसंघांतील हालचालींमुळे भाजप सध्या थोडा आश्चर्यचकीत झालेला आहे.

पणजी : भाजपप्रणीत आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या विधानांमुळे व विविध मतदारसंघांतील हालचालींमुळे भाजप सध्या थोडा आश्चर्यचकीत झालेला आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांना मुख्यमंत्रीपदी आम्ही बसवले, खनिज खाणी लोकसभा निवडणुकीपर्यंत जर खाणी सुरू झाल्या नाही तर लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला पाठींबा का द्यावा याविषयी फेरविचार करावा लागेल असा इशारा मंत्री विजय सरदेसाई यांनी दिल्यानंतर भाजपला धक्काच बसला आहे.मुख्यमंत्री पर्रीकर हे गेल्या अडिच महिन्यांपासून अमेरिकेत आहेत. त्यांनी तीन मंत्र्यांची एक समिती गोव्याचा कारभार हाकण्यासाठी नेमली आहे पण त्या समितीला मर्यादित अधिकार आहेत. तीन मंत्र्यांच्या समितीपेक्षा जास्त अधिकार सध्या मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्री. कृष्णमूर्ती यांना आहेत. गोवा मंत्रिमंडळाची एकही बैठक मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे गेल्या तीन महिन्यांत होऊ शकलेली नाही. मुख्यमंत्री अडिच महिने अमेरिकेत असले तरी, तत्पूर्वी ते मुंबईत उपचार घेत होते. त्यामुळे सुमारे शंभर दिवस मुख्यमंत्री गोव्याबाहेर आहेत, आजारामुळे ते प्रशासकीय कामाबाबत सक्रिय राहू शकलेले नाहीत अशी स्थिती आहे. सध्या गोवा सरकारमधील अनेक मंत्री व आमदारही सुट्टीच अनुभवत आहेत. काहीच कामे होत नसल्याने आम्ही कुटूंबासोबत मे महिन्यात सुट्टीच अनुभवत आहोत असे एका मंत्र्याने सांगितले. सध्या पर्यटन मंत्री सहकुटूंब अमेरिकेला गेलेले आहेत. त्या शिवाय अन्य दोन मंत्री विदेशात आहेत. काही आमदारही गोव्याबाहेर आहेत. सरकारचा गाडा पुढे नेण्याची जबाबदारी सध्या गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या दोनच पक्षांवर आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले मंत्री सरदेसाई म्हणतात की, त्यांचा गोवा फॉरवर्ड हा पक्ष केंद्रातील एनडीएचा भाग आहे. तथापि, गोव्यातील खनिज खाणी जर सुरू झाल्या नाहीत तर लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला पाठींबा द्यावा की नाही हे आम्हाला ठरवावे लागेल. मंत्री सरदेसाई यांच्या या विधानावर विरोधी काँग्रेस पक्ष थोडा खूष झाला आहे. मात्र भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांना पत्रकारांनी विचारले तेव्हा मंत्री सरदेसाई यांच्याशी भाजप नेतृत्व बोलेल, खनिज खाणी भाजप सरकारने बंद केलेल्या नाहीत, काँग्रेस तसे चित्र उभे करू पाहत आहे असे नाईक म्हणाले.महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा देखील भाजपप्रणीत आघाडी सरकारचा घटक पक्ष आहे. या पक्षाच्या नेत्यांनी आम्ही लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणो लढवू शकतो अशी विधाने चालवली आहेत. आपण एनडीएचा भाग नाही असे या पक्षाचे म्हणणो आहे. कुठच्याच पक्षाला लोकसभा निवडणुकीवेळी केंद्रात स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशा अर्थाचे विधान नुकतेच मगोपच्या नेत्यांनी केल्यामुळे भाजपमध्ये त्याबाबतही चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री र्पीकर विदेशात असल्याने गोव्यातील सत्ताधारी आघाडीचे घटक पक्ष वाट्टेल ते बोलत सुटले आहेत अशी भाजपमधील काही आमदारांची भावना होऊ लागली आहे.