शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

भाजप प्रदेशाध्यक्ष पद; सहा नावे अखेर शॉर्टलिस्ट, कोअर टीम बैठक यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2025 07:48 IST

दामू नाईक, नरेंद्र सावईकर, परुळेकर यांच्यात मोठी स्पर्धा; मंडळ अध्यक्षांना वयाची अट, कार्यकर्ते नाराज

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी दावेदार म्हणून सहा इच्छुकांची नावे पक्षाने दिल्लीला पाठवली आहेत. ही माहिती कोअर टीम बैठकीवेळी शुक्रवारी पुढे आली. दामू नाईक, अॅड. नरेंद्र सावईकर, बाबू कवळेकर, दिलीप परुळेकर, दयानंद मांद्रेकर व दयानंद सोपटे, अशी सहा नावे पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचली आहेत. येत्या ६ रोजी कोअर टीमची पुन्हा बैठक होणार आहे.

दरम्यान, भाजप मंडल अध्यक्षपदी ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये नावे निश्चित झालेली असून या निवडीवरुन पक्षात मोठी स्पर्धा आहे. मंडल अध्यक्षपदासाठी उमेदवार ४५ वर्षांखालील असावा, अशी अट असल्याने अनेक जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांची एवढी वर्षे पक्षासाठी काम करुनही संधी हुकली. पक्षासाठी आम्ही केवळ चपलाच झिजवाव्यात का? असा सवाल नाराज कार्यकर्ते करत आहेत.

'लोकमत'ला मिळालेल्या माहितीनुसार, वेळ्ळी, नुवे, बाणावली व मडकई या चार मतदारसंघांमध्ये भाजपची सदस्य नोंदणी अगदीच अल्प झाली आहे. तिथे बूथदेखील स्थापन करता आलेले नाहीत. त्यामुळे हे चार मतदारसंघ वगळता इतर ३६ मतदारसंघात अध्यक्ष निवडले असून नावांची अधिकृत घोषणा उद्या, रविवारी होणार आहे.

एकीकडे संघटनात्मक निवडणुकांवरुन भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरु असताना दुसरीकडे मडकई मतदारसंघावरुन भाजप-मगोत संघर्ष निर्माण झालेला आहे. मडकईत भाजपची मंडळ समिती स्थापन झालेली नाही. काही कार्यकर्त्यांची कामे ढवळीकर करत नाहीत, अशी तक्रार एक-दोन भाजप नेते करत आहेत. मात्र, ज्यांची कामे झाली नाहीत असे सांगितले जाते, ते काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत, असा दावा मंत्री ढवळीकर यांनी भाजपसोबत झालेल्या बैठकीत केल्याचे समजते.

सुदिन दिल्लीत दाखल 

आपल्याविषयी तक्रार करणारे कोण त्यांची नावे सांगा, असा आग्रह ढवळीकर यांनी तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत धरल्याचे समजते. परंतु भाजप नेत्यांनी नावे उघड केली नाहीत. सुदिन यांनीही सामंजस्याची भूमिका घेत १९८४ पासून आपण नेहमीच भाजपला सहकार्य करीत आलो आहे, असे सांगितले. दिवंगत मनोहर पर्रीकर यांना सर्व ठाऊक होते संजीव देसाई हेही साक्षीदार आहेत, असेही ते म्हणाले. ढवळीकर यांनी शुक्रवारी दुपारी गोव्याहून दिल्ली गाठली. तिथे ते भाजपच्या काही केंद्रीय नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे.

'आमचे संबंध चांगले' 

प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मंडल अध्यक्षपदांवरुन किंवा अन्य कोणत्याही बाबतीत पक्षात कोणतीच नाराजी नाही. वयोमर्यादा 'वरुन' निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याचे पालन करावेच लागेल. मंडल अध्यक्षांची नावे रविवारी जाहीर होतील तेव्हा कोणाचीच नाराजी नसेल. मडकई व फोंडा मतदारसंघातील भाजप-मगो संघर्षाबद्दल विचारले असता तसा कोणताही संघर्ष नसल्याचे तानावडे म्हणाले. मगो व भाजप यांचे संबंध एकमेकांशी चांगले आहेत असे ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा