शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर पर्रीकरांचा नेमका आजार जाहीर करा; काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 13:55 IST

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना नेमका कोणता आजार झाला आहे, याची अधिकृत माहिती सरकारनं 24 तासांच्या आता जाहीर करावी आणि मुख्यमंत्रिपदाचाही त्याग करावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे.

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना नेमका कोणता आजार झाला आहे, याची अधिकृत माहिती सरकारनं 24 तासांच्या आता जाहीर करावी आणि मुख्यमंत्रिपदाचाही त्याग करावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. मनोहर पर्रीकर उपचारांसाठी पुन्हा अमेरिकेत गेले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ही मागणी करण्यात येत आहे. 

गोव्यात सरकार संविधानावर चालते की पर्रीकर यांच्या दादागिरीवर? असा प्रश्न उत्तर जिल्हा अध्यक्ष विजय भिके यांनी पत्रकार परिषदेत केला. पर्रीकर हे गंभीर आजारी असल्याने मुख्यमंत्री बदलण्याची गरज आहे. परंतु बहुजन समाजाचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून पर्रीकर पद सोडायला तयार नाहीत, असा आरोपही भिके यांनी केला. ते म्हणाले की, राज्यात लोकशाही नव्हे तर हुकूमशाही चालली आहे. स्वातंत्र्यदिनी पर्रीकर यांनी झेंडावंदनाची जबाबदारी कुठल्याही अन्य मंत्र्याकडे न देता सभापतींकडे सोपवली.

पर्रीकर हे मनमानी करत आहेत. सरकार म्हणजे त्यांच्या घरातील कंपनी नव्हे, त्यांनी सत्तेच्या लालसेपोटी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अन्य कोणाकडे देण्याचे टाळले आहे, असा आरोपही भिके यांनी केला. ते पुढे म्हणाले की,  2017 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडे 17 आमदार आले असतानाही भाजपने सत्ता चोरली आणि घटनाबाह्य सरकार स्थापन केले. पर्रीकर मंत्रिमंडळातील  अन्य तीन मंत्रीही आजारी आहेत परंतु मुख्यमंत्री बदलण्याची गरज आहे. याचे कारण जनतेला मुख्यमंत्रीपदी सदैव कार्यरत असलेली व्यक्ती हवी आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी परी कर अमेरिकेला उपचारासाठी गेले होते. परंतु अर्थसंकल्पाला हजर राहिले आणि थोडक्यात अर्थसंकल्प गुंडाळला. त्यांच्या आजाराबद्दल माहिती लपविली जात आहे. पर्रीकर यांनी आता मुख्यमंत्रिपद सोडण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःहून या पदाचा त्याग करावा अशी मागणी भिके यांनी केली.

दरम्यान, मुंबई येथील लीलावती इस्पितळातून गुरुवारी पहाटे पर्रीकर अमेरिकेला पुढील उपचारासाठी गेले आहेत. मुख्यमंत्री नसल्याने प्रशासन कोलमडले असल्याची भावना विरोधी पक्षांची झालेले आहे. कामे ठप्प झाल्याने जनतेमध्येही नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाcongressकाँग्रेस