शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

भाजपा दक्षिण गोव्यात पंतप्रधानाची सभा घेण्याच्या तयारीत - प्रमोद सावंत 

By वासुदेव.पागी | Updated: April 13, 2024 15:24 IST

Lok Sabha Election 2024 : सभा कुडचडे येथे  घेण्याचेही ठरले आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे. 

पणजी : भाजपा दक्षिण गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी सभा घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी केवळ पंतप्रधानाच्या होकाराच्या प्रतीक्षेत पक्ष आहे. 28 एप्रिल ते १ मे या दरम्यान ही सभा होऊ शकते. सभेसाठी जागा ही निश्चित करण्यात आली आहे. यावेळी गोव्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. 

उत्तर गोव्यातील विजया बाबतीत भाजपला शंका नाहीत परंतु दक्षिण गोव्यात कोणत्याही परिस्थितीत जिंकणे हे प्रमुख लक्ष बनवीले आहे. त्यासाठी रणनीती ही ठरविण्यात आली आहे. पक्ष कार्यकर्त्यांना आणि मतदारांना विश्वास मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दक्षिण गोव्यात मोठी जाहीर सभा आयोजित करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. ही सभा कुडचडे येथे  घेण्याचेही ठरले आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे. 

यासाठी पंतप्रधानाच्या होकाराची प्रतीक्षा पक्षाला आहे. पंतप्रधानांनी वेळ दिला तर ही सभा निश्चित घेतली जाणार आहे आणि ती यशस्वी केली जाणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान, दक्षिणेचा किल्ला सर करण्यासाठी भाजपने पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. पक्षाच्या उमेदवार पल्लवी धेम्पे या मतदारांना भेटत आहेत. आमदार दिगंबर कामत हे त्यांच्या प्रचारात खूप सक्रिय झाले असून मडगाव  आणि सासष्टीतील इतर भागातही त्यांनी धेंपे यांच्यासह प्रचार दौरे केले आहेत.

काँग्रेस पक्षाची या मतदारसंघात सर्व मदार सासष्टी   तालुक्यातील मतदारांवर आहे. काँग्रेसचे दक्षिण गोव्यातील दोन्ही आमदार युरिया आलेमाव आणि अल्टन दिकॉस्टा हे काँग्रेसचा प्रचार करीत आहेत. त्यांनीही विशेष भाग हा सासष्टी तालुक्यावरच दिला आहे. शिवाय मुरगाव तालुक्यातूनही या पक्षाला आशा आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४Pramod Sawantप्रमोद सावंतNarendra Modiनरेंद्र मोदी