शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

गोव्यात भाजपाला धक्का; आमदार एलिना साल्ढाणा यांनी आम आदमी पार्टीमध्ये केला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 22:33 IST

श्रीमती साल्ढाणा यांनी राजीनामा देण्यापूर्वीच सकाळी आम्ही त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे असा दावा रात्री भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला.

पणजी : माजी वन मंत्री श्रीमती एलिना साल्ढाणा यांनी आज सकाळी भाजपच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला व सायंकाळी दिल्लीला जाऊन आम आदमी पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे आपमध्ये स्वागत केले. आपमध्ये प्रवेश केलेल्या त्या गोव्यातील पहिल्या भाजप आमदार ठरल्या. गोव्यात आपचे काम जोरात सुरू आहे. भाजप हा आता तत्त्वांचा पक्ष राहीलेलाच नाही, तो दिशाहीन झालाय अशी टीका साल्ढाणा यांनी केली. 

दरम्यान, श्रीमती साल्ढाणा यांनी राजीनामा देण्यापूर्वीच सकाळी आम्ही त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे, असा दावा रात्री भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला. साल्ढाणा यांच्याविरुद्ध सभापतींकडे अपात्रता याचिका सादर केली जाईल असे ते म्हणाले. 

तानावडे म्हणाले की, एलिना साल्ढाणा यांना २०१२  साली त्यांची कुठलीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना माजी मंत्री माथानी साल्ढाणा यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी म्हणून  भाजपने उमेदवारी दिली आणि बिनविरोध निवडून आणले होते. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना  त्या फक्त भाजपाच्या उमेदवार म्हणून  तेव्हा निवडून आल्या. त्यानंतर भाजपच्या सरकारमध्ये त्या मंत्री झाल्या होत्या. 

२०१७  साली स्थानिकांचा विरोध असतानाही त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आणि भाजपाने निवडून आनले. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांनी सातत्याने भाजपाच्या विरोधात व सरकारच्या विरोधात आपली भूमिका घेणे सुरू केले होते . आणि त्यामुळेच आज सकाळीच भाजपाने एलिना साल्ढाणा यांना पक्षातून काढून टाकले होते . असा खुलासा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज केला आहे. रात्री पत्रकार परिषदेत बोलताना तानावडे म्हणाले की  एलिना यांना पक्षातून काढल्यानंतर त्यांनी आमदारकीचा  राजीनामा दिला.

पक्षाचा राजीनामा न देता आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला . त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे .मात्र तो राजीनामा सभापती स्वीकारलेला नसतानाच त्या आम आदमी पक्षामध्ये सहभागी झाल्या आहेत. आणि त्यानंतर त्यांना आठवण झाल्यानंतर रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी  भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे . अशी माहिती देउन या सर्व कायदेशीर बाबी आहेत. आणि त्याबाबत पक्ष कायदेशीर सल्ला घेत असल्याचे तानावडे यांनी सांगितले. 

पक्षाचा राजीनामा न देता आमदारकीचा राजीनामा स्वीकारलेला  नसतानाही दुसऱ्या पक्षात सामील होणे हा कायदे भंग ठरतो की नाही हे आपणास माहित नाही. मात्र त्यावर कायदेशीर सल्लामसलत सुरू असल्याचे एका प्रश्नावर बोलताना तानावडे यांनी सांगितले. कुठ्ठाळीमध्ये भाजप पक्षाचा विस्तार चांगल्या रीतीने झालेला आहे आणि त्यामुळे तेथे भाजपाचा उमेदवार पुन्हा एकदा निवडून येईल असेही पुढे यावेळी तानावडे म्हणाले .

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपाgoaगोवाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल