शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात कमळ खुललं, मोठा विजय; दोन्ही पालिकांवर भाजपचा झेंडा

By किशोर कुबल | Updated: May 7, 2023 11:32 IST

फोंड्यात रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र रितेश व रॉय निवडून आले. साखळीत मुख्यमंत्र्यांच्या पॅनलला क्लीन स्वीप मिळाली

किशोर कुबल/ पणजी

पणजी : गोव्यात साखळी व फोंडा या दोन्ही पालिकांवर भाजपने झेंडा फडकावला आहे. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची साखळीत तर कृषीमंत्री रवी नाईक यांची फोंड्यात प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणुका पक्ष विरहित असल्या तरी भाजपसह सर्वच पक्षांनी आपली ताकद लावली होती.

फोंड्यात रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र रितेश व रॉय निवडून आले. साखळीत मुख्यमंत्र्यांच्या पॅनलला क्लीन स्वीप मिळाली. १२ पैकी ११ जागा भाजपने जिंकल्या. खुद्द ‘ टुगेदर फॉर साखळी’ या विरोधी पॅनलचे नेते धर्मेश सगलानी यांचा ३० मतांनी पराभव झाला. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत सगलानी हे मुख्यमंत्री सावंत यांचे प्रबळ प्रतिस्पर्धी ठरले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांना केवळ ६६६ मतांनी पराभव पत्करावा लागला होता.दुपारी राज्य निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केले. साखळी पालिकेत ८७.५६ टक्के विक्रमी मतदान झाले होते. तर फोंडा पालिकेत ७४.६६ टक्के मतदान झाले होते.साखळीतील प्रभाग ८ मध्ये रियाझ खान व प्रभाग ५ मध्ये प्रवीण ब्लॅगन तर फोंड्यात प्रभाग ७ मध्ये भाजपचे विश्वनाथ दळवी व प्रभाग १३ मध्ये विद्या पुनाळेकर आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.................             लोकांनी विश्वास दाखवला ; लोकसभेतही             दोन्ही जागा भाजपच जिंकणार : तानावडेभाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या विजयावर प्रतिक्रिया देताना लोकांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वावर विश्वास दाखवल्याचे म्हटले आहे. राज्यात आणि केंद्रात भाजप सरकारचे जे काम चालले आहे त्याची लोकांनी पावती दिली. साखळीत १२ पैकी ११ जागा भाजपला मिळाल्या हे मोठे यश आहे. फोंड्यातही मंत्री रवी नाईक यांच्यावर लोकांनी विश्वास दाखवला. येत्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा भाजपच जिंकणार याचे हे संकेत आहेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवाElectionनिवडणूकBJPभाजपाMuncipal Corporationनगर पालिका