शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

बिस्मार्कचा अर्धा दिवस बिअरच्या नशेतच

By admin | Updated: November 15, 2015 01:40 IST

पणजी : स्वर्गीय फादर बिस्मार्क डायस यांनी कुणाविरुद्ध यापूर्वी तक्रारी दिल्या होत्या, सांतइस्तेव्ह येथील कोमुनिदाद व

पणजी : स्वर्गीय फादर बिस्मार्क डायस यांनी कुणाविरुद्ध यापूर्वी तक्रारी दिल्या होत्या, सांतइस्तेव्ह येथील कोमुनिदाद व क्रीडा संघटनेत त्यांचा कुणाशी वाद झाला होता, फादर डायस बुडून मरण पावले त्या दिवशी चारवेळा त्यांनी कुणाकडून बिअर खरेदी केली, या व अन्य सर्व घटनांचा परामर्ष घेत पोलिसांनी बिस्मार्कच्या पूर्ण कारकिर्दीचाच एकप्रकारे पंचनामा केला आहे. त्याच्या आधारे असे लक्षात येते की बिस्मार्कचा अर्धा दिवस बिअरच्या नशेतच गेलेला होता. उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी सरकारला सविस्तर अहवाल सादर केला आहे. त्या अहवालाची प्रत ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे. सात पानांच्या त्या अहवालातून फादर डायस यांचे दिवसभरातील वर्तन कळून येतेच, शिवाय त्यांचे यापूर्वी कुणाशी कोणत्या कारणावरून वाद झाले होते तेही स्पष्ट होते. बिस्मार्क बेपत्ता झाल्याची तक्रार बिस्मार्कच्या चुलत भावाने ६ नोव्हेंबर रोजी जुनेगोवे पोलिसांत दिली होती. ५ नोव्हेंबर रोजी बिस्मार्कने दुपारी दीड वाजता सांतइस्तेव्ह येथील पालमार वाईन स्टोअरला भेट देऊन बिअरची मोठी बाटली घेतली. ती तो प्याला व मग साडेचार वाजता परमेश्वर नावाच्या व्यक्तीला त्याने याच वाईन स्टोअरवर पाठवून आणखी एक बिअर घेतली. मग साडेसहा वाजता बिस्मार्कने सतरा वर्षीय गणेश व अठरा वर्षीय डॅरेन या दोघा युवकांना सोबत घेतले व आपले घर गाठले. त्याने पाचशे रुपये या दोघांजवळ देऊन त्यांना बिअरचे एक कार्टन आणण्यास सांगितले. त्यानंतर सांतइस्तेव्ह येथील बाबल मानसजवळ सर्वांनी रात्री झोपण्यासाठी जाण्याचे ठरले. या वेळी या तिघांनी मिळून बबली बार गाठला व तिथून उधारीवर आणखी एक बिअर कार्टन आणले, असे पोलीस अहवालात म्हटले आहे. बाबल मानस येथे एक झोपडी असून तिथे दुचाकी वाहनही जाऊ शकत नाही. तिथे पंधरा ते वीस मिनिटे हे तिघेही चालत गेले. फादर डायसजवळ बॅटरी होती. रात्री तिघेही मानशीच्या झोपडीजवळ प्यायला बसले. फादर डायस यांनी मानशीजवळ पाण्यात उडी मारली. थोडा वेळ पोहून ते बाहेर आले व पुन्हा बिअर प्याले. मग मांडवी नदीच्या मुखापासून दहा मीटर अंतरावर फादर बिस्मार्क हे पाण्यात उतरले व नदीच्या मुखाच्या दिशेने गेले आणि मग पाण्यातून ते बाहेर आलेच नाहीत, असे पोलीस अहवालात म्हटले आहे. गणेश व डॅरेन या दोघांनी बॅटरीच्या उजेडात बिस्मार्क यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिस्मार्कचा शोध न लागल्याने ते दोघेही मानशीजवळील झोपडीत येऊन झोपले. बिस्मार्क येतील असे त्या दोघांना वाटले होते, असे पोलीस अहवालात म्हटले आहे. तत्पूर्वी फादर बिस्मार्क यांच्या घरापासून १०-१५ मीटरवरील एका जागेत जॉयसन नावाची व्यक्ती आणि गणेशचा भाऊ हे डॅरेन व गणेश यांचा शोध घेण्यासाठी आले होते. घरची मंडळी या दोघांना शोधत असल्याचे त्यांनी फादर बिस्मार्क यांना सांगितले. त्या वेळी बिस्मार्क यांनी हे दोन्ही युवक आपल्यासोबत असल्याचे त्यांच्या पालकांना सांगा, आपण त्यांना नंतर घरी आणून सोडेन, असे जॉयसन व गणेशच्या भावाला सांगितले, असे पोलीस अहवालात म्हटले आहे. त्यानंतर जॉयसन व गणेशचा भाऊ निघून गेले. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी फादर डायस यांचा मृतदेह मांडवी नदीत सांतइस्तेव्ह येथे तरंगताना आढळला. आपल्याला धमक्या येत असल्याचे फादर डायस यांनी पोलिसांना कधीच कळवले नव्हते. (खास प्रतिनिधी)