शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बीफ विक्री बंदीमुळे 1 कोटी 25 लाखांचा व्यवहार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 17:51 IST

मांस विक्रेत्या संघटनेने पुकारलेल्या संपामुळे शनिवारी आणि रविवार अशा दोन दिवसांत प्रति दिनी 62 लाख 50 हजार रुपयांप्रमाणो 1 कोटी 25 लाख रुपयांचा व्यवहार ठप्प झाला.

पणजी : बिगरसरकारी पशुसंवर्धन संस्थांकडून होणा-या तपासणीमुळे कंटाळून येथील कुरेशी मांस विक्रेत्या संघटनेने पुकारलेल्या संपामुळे शनिवारी आणि रविवार अशा दोन दिवसांत प्रति दिनी 62 लाख 50 हजार रुपयांप्रमाणो 1 कोटी 25 लाख रुपयांचा व्यवहार ठप्प झाला.गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि नाताळाच्या तोंडावर पाटो-पणजी येथे बोलेरो गाडीला अपघात झाल्यामुळे सुमारे दीड हजार किलो बेकायदा बीफ हॉनोररी अ‍ॅनिमल वेल्फेअर संस्थेच्या अधिका-यांनी पकडून त्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर काही दिवसांतच वेर्णा येथे पशुसंवर्धन मंडळाच्या अधिका-यांनी पोलिसांच्या मदतीने छापा टाकून सुमारे दीडशे किलो बीफ आणि दोघांना साहित्यासह ताब्यात घेतले होते. त्यामुळे पाच दिवस मांस विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली होती. मात्र पुन्हा दोन दिवसांपूर्वी होंडा येथे कर्नाटकातून बीफ घेऊन येणारी बिगरसरकारी संस्थेने पकडली. त्यातही काही लाख रुपयांचे बीफ सापडले होते. यावरून बिगरसरकारी पशुसंवर्धन संस्थांकडून होणा-या या वारंवारच्या तपासणीमुळे मांस विक्रेते चांगलेच त्रसले. त्यामुळे शनिवारपासून कुरेशी मांस विक्रेत्या संघटनेने संप पुकारला.या पुकारलेल्या संपामुळे रविवारीही दुकाने बंद राहिल्याने बीफ खरेदी करणा-यांवर चांगलाच परिणाम झाला. अनेकांनी दुकाने बंद असल्याचे पाहून चिकन आणि मासळी खरेदीला पसंती दिली. राज्यात दर दिवशी 25 टन बीफ विकले जात असून, विक्रेत्यांकडे 15 टन आणि केटरटर्स, हॉटेल व मॉलवाले यांना 10 टन बीफ लागते.250 रुपये किलोप्रमाणे विकले जाणा-या बीफचा मांसाची आवक बंद झाल्यामुळे 62 लाख 50 हजार रुपयांचा रोजचा व्यवहार होत होता. दोन दिवसांमुळे 1 कोटी 25 लाख रुपयांचा व्यवहार ठप्प झाला असून, सोमवारी मुख्यमंत्री दिल्लीहून परतल्यानंतर बैठक होईल. मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतरच या विक्रीविषयी काहीतरी निर्णय होऊ शकतो. अन्यथा तिस-या दिवशी दुकाने बंद राहिल्यास एकूण तीन दिवसांत बीफ विक्रीचा 1 कोटी 87 लाख रुपयांचा व्यवहार ठप्प होणार आहे.कॅटरर्सवरही परिणामबीफ बंदीमुळे कटलेट्स तयार करणारे छोटे दुकानदार, त्याचबरोबर पार्टीची ऑर्डर घेणारे कॅटर्स यांच्या व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे. नाताळानंतर कॅटर्स यांचा चांगला व्यवसाय चालतो. कारण कोणाचे लग्न, त्याचबरोबर कोणाच्या वाढदिवस पार्टी, लग्नाची पार्टी वगैरे असतात. त्यांत त्यांना बीफपासून काही पदार्थ बनविणो अपेक्षित असते, बीफच नसल्यामुळे त्यांच्याही व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी आशा त्यांना लागून आहे.आज बैठक शक्यशनिवारी झालेल्या बैठकीत संघटनेला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दोन दिवसांनंतर बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सोमवारी पर्रीकर उपलब्ध असल्यास संघटनेची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीची निश्चित वेळ समजली नसल्याने ती सायंकाळी होईल, असे संघटनेच्या सदस्यांनी सांगितले.