शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील बीफ विक्रेत्यांचा संप कायम; सरकारने पुरवठा केल्यास विक्री करू, संघटनेची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 21:20 IST

पशु संवर्धनासाठी काम करणाऱ्या बिगरसरकारी संस्थांकडून वारंवार होणाऱ्या बीफच्या तपसाणीविरोधात शनिवारपासून संपावर गेलेल्या बीफ विक्रेत्यांचा संप कायम राहणार आहे.

पणजी : पशु संवर्धनासाठी काम करणाऱ्या बिगरसरकारी संस्थांकडून वारंवार होणाऱ्या बीफच्या तपसाणीविरोधात शनिवारपासून संपावर गेलेल्या बीफ विक्रेत्यांचा संप कायम राहणार आहे. दरम्यान, येथील मांस विक्रेता संघटनेला दोन दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले आहे. 

होंडा येथे शुक्रवारी रात्री गोव्यात विक्रीस आणले जाणारे दीड हजार किलो बेकायदा बीफ सापडले. गेल्या पंधरा दिवसांतील ही तिसरी मोठी घटना असल्याने बीफ विक्रेते चांगलेच संतप्त झाले आहेत. पशु संवर्धनासाठी काम करणाऱ्या बिगरसरकारी संस्थांनी केलेल्या तपासात बीफ घेऊन येणाऱ्या वाहनधारकांकडे कोणतच कायदेशीर कागदपत्रे नाहीत म्हणून ते जप्त केले जाते. बिगरसरकारी पशुसंवर्धन संस्थांकडून हा नाहक त्रास दिला जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या त्रासाला कंटाळूनच बीफ विक्रेत्यांनी शुक्रवारी रात्री संपाची घोषणा केली. 

आज राज्यातील बीफ विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली होती. सायंकाळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्याचबरोबर बिगरसरकारी पशुसंवर्धन संस्थांकडून होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दोन दिवसांत याविषयावर बैठक घेतली जाईल आणि त्यावर तोडगा काढला जाईल, असे कुरेशी मांस विक्रेता संघटनेचे अध्यक्ष मन्ना बेपारी यांनी सांगितले. मात्र, आमचा संप सकारात्मक निर्णय होत नाही, तोर्पयत चालू राहील, असे ते म्हणाले. या व्यवसायात चारशेच्या आसपास कर्मचारी काम करीत असून, त्यांचाही विचार करणो अपेक्षित आहे. 

मासे, चिकनची मागणी वाढणारबीफ खरेदी करणारा विशिष्ट वर्ग असल्याने एका-एका विक्रेत्याला दिवसाला सुमारे अडीचशे किलो मांस लागते. राज्यभरात शंभरच्यावर बीफ विक्री करणारी दुकाने आहेत. ती दुकाने बंद ठेवल्याने बीफ खरेदी करणा:या लोकांना चिकन, बोकडाचे मांस किंवा मासळी घेऊन जावी लागत आहे. हा संप दोन दिवसांपेक्षा अधिक काळ राहिला तर मासळी आणि चिकन यांची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. 

राज्य सरकारने बीफ पुरवावेबिगरसरकारी पशुसंवर्धन संस्थांच्या त्रसामुळे आम्ही आमचा तोटा करून घेऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना राज्यात बीफचा तुटवडा पडणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कायदेशीररित्या आम्हाला बीफ पुरविले तर आम्ही त्याची विक्री करण्यास तयार आहोत, असे बेपारी यांनी सांगितले. मात्र, दोन दिवस मुख्यमंत्री गोव्यात नसणार असल्याने त्यावर दोन दिवसांनीच तोडगा निघणार आहे. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर