शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

हिंदू धर्म रक्षणासाठी कटिबद्ध व्हा; जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे भक्तांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 12:13 IST

त्रिपुरारी पौर्णिमेच्या वारी उत्सवाच्या गोवा पीठातील शिव मंदिरातील प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क वास्को : 'हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध होऊया' असे आवाहन जगद्‌गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी केले. त्रिपुरारी पौर्णिमेच्या वारी उत्सवाच्या गोवा पीठातील शिव मंदिरातील प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज म्हणाले की, भारतीय संविधानातील कलम ३४० हे आदिवासींच्या संरक्षणासाठी निर्माण केलेले आहे. आदिवासींना आपल्या प्रथा, परंपरा, आपली संस्कृती, संस्कार हे जपले पाहिजे. यासाठी कायद्यात त्यांना संरक्षण दिलेले आहे. म्हणून ते आरक्षण आहे. परंतु ख्रिश्चन मिशनरी त्यांचा अज्ञानाचा फायदा घेऊन तुम्ही वनवासी आहात, आदिवासी आहात, तुमचा आणि हिंदूचा संबंध नाही, अशा प्रकारे गैरसमज पसरवू लागलेले आहेत. त्यामुळे आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे की, ते आदिवासी देय जे लोक आपली उपासना बदलून अशा प्रकारे आचरण करतात,त्यांच्या सवलती काढून घ्या. 

उत्सवाला पद्मनाभ शिष्य संप्रदाय पीठाधीश, चैतन्य आश्रम बोरीचे परमपूज्य राधे स्वामी, आरएसएसचे संघ संचालक मोहन आमशेकर, विश्व हिंदू परिषदेचे सदस्य अनिल सामंत, गोवा मराठी अकादमी अध्यक्ष संतोष नाईक, पद्मनाभ सांप्रदायिक अध्यक्ष आणि विश्व हिंदू परिषद अध्यक्ष चंद्रकांत गवस व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष गावस यांनी सांगितले की, जे कार्य नरेंद्राचार्यजी माऊलींनी सुरू केले आहे, तेच कार्य आम्ही करीत आहोत. सगळ्याच संप्रदायांना एकसंघ करण्याची गरज आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, नरेंद्राचार्यजी महाराजांचे कार्य मला ज्ञात आहे. स्वामींनी सनातन हिंदू धर्माची पताका उंचावण्याची जबाबदारी सोपविली आहे. ही हिंदू धर्माची पताका उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करू. यावेळी विविध आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. युवांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम, नूतन शिव मंदिराची पायाभरणी, दीपमाला प्रज्वलन करण्यात आले. गरीब व गरजूंना चारा कापण्याचे मशीन दिले. नरेंद्राचार्यजी माऊलींच्या हस्ते ब्रह्मानंद स्वामींच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. मरणोत्तर देहदानाचे अर्ज स्वामींच्या हस्ते वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत