शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बाणस्तारी अपघात प्रकरण: मेघनाची कोठडी हवी की नको; पोलिस बुचकळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 11:19 IST

पोलिसांनी १६ रोजी आपली भूमिकाच स्पष्ट केली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : बाणस्तारी येथील अपघातात ६ वाहनांना ठोकणाऱ्या व तिघांचा जीव घेणाऱ्या मर्सिडीजमध्ये असलेल्या मेघना सिनाय सावर्डेकर हिची कोठडी म्हार्दोळ पोलिसांना हवी आहे की नको, या बाबतीत पोलिसच संभ्रमित अवस्थेत असल्याचे बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी दिसून आले आहे.

मेघना हिच्या अटकेची जोरदार मागणी करून लोकांनी म्हार्दोळ पोलिस स्थानकावर मोर्चा नेऊन पोलिसांवर दबाव आणल्यानंतर मेघना हिने फोंडा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करून अंतरिम दिलासा मिळविला होता. यावर पोलिसांना आपले म्हणणे १६ ऑगस्ट रोजी मांडण्यास सांगण्यात आले होते; मात्र पोलिसांनी १६ रोजी आपली भूमिकाच स्पष्ट केली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मेघनाला अटक करून तिची कोठडीत चौकशी करण्याची गरज आहे की नाही याचाही खुलासा केलेला नाही. या बाबतीत पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यास वेळ मागितला आहे. पुढील सुनावणी २३ ऑगस्ट रोजी होणार असून तोपर्यंत पोलिसांना प्रतिज्ञापत्र सादर करून आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

परेशला न्यायालयीन कोठडी; मेघनाला दिलासा

बाणस्तारी येथे ६ ऑगस्ट रोजी दारूच्या नशेत कार चालवून तीन लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या परेश न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर परेशची पत्नी मेघना सावर्डेकर याला मंगळवारी १४ दिवसांची सावर्डेकर हिला २३ ऑगस्टपर्यंत न्यायालयाने दिलासा दिला आहे. आरोग्यविषयक कारणावरून न्यायालयाने मेघनाला १६ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले होते, ही मुदत बुधवारी संपली. बुधवारी अटकपूर्व जामिनावर पुन्हा युक्तिवाद झाला व तिला २३ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. परेश सावर्डेकर याने दाखल केलेला जामीन अर्ज दोन्ही वेळेस फेटाळण्यात आला आहे. आता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आपल्या जामिनावर त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली असून त्याच्यावर आज, गुरुवारी सुनावणी होणार आहे.

ठळक नोंदी

- या प्रकरणात मेघनाची नोंद पोलिस डायरीत संशयित म्हणून नाही. गुन्हा परेश सावर्डेकरविरुद्ध नोंदविण्यात आला आहे.

- मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा चालकाशिवाय इतरांविरुद्ध नोंदविता येत नाही. तसेच एक वाहन एकावेळेस एकपेक्षा अधिक लोक चालवू शकत नाहीत.

- मेघना ही साक्षीदार असल्याची पोलिसांची मूळ भूमिका विचारात घेतली तरी साक्षीदाराला अटक करता येत नाही.

- तिला मुख्य संशयित म्हटले तर परेशला का अटक केली? असा प्रश्न उपस्थित होणार आहे. 

 

टॅग्स :goaगोवा