शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बाणस्तरी अपघात प्रकरण; तिघांना उडविणारा मर्सीडीस चालक जामीनवर मुक्त

By वासुदेव.पागी | Updated: August 24, 2023 16:48 IST

महत्तवाचे म्हणजे पोलिसांनीही त्याच्या कोठडीची मागणी केली नाही.

पणजी: बाणस्तारी अपघात प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला मर्सीडीस चालक श्रीपाद उर्फ परेश सिनाय सावर्डेकर याला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला. महत्तवाचे म्हणजे पोलिसांनीही त्याच्या कोठडीची मागणी केली नाही. ६ ऑगस्ट रोजी दारुच्या नशेत बेपर्वाईने कार चालवून आपघात करून तिघांचा जीव घेणारा खेळ परेशने केला होता.७ ऑगस्ट रोजी त्याला अटक करण्यात आली होती तर त्यानंतर १५ दिवस तो तुरुंगात होता. त्याने जामीनसाठी केलेला अर्ज फोंडा सत्र. न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्याने खंडपीठात धाव घेतली होती. अनेकवेळा सुनावणीस येऊन शेवटी गुरूवारी त्याच्या याचिकेवर निवाडा सुनावण्यात आला. त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. साक्षीदारांवर दबाव न आणणे, १ लाख रुपये हमी आणि १ लाख रुपयांच्या रकमेचे दोन हमीदार, गोव्याबाहेर सोडून न जाणे आणि तपास अधिकाऱ्यासमोर ८ दिवस हजेरी लावणे या अटी त्याच्यावर लादण्यात आल्या आहेत. दर दिवशी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत तो क्राीम ब्रँच कार्यालयात हजेरी लावणार आहे.महत्तवाचे म्हणजे सुनावणी दरम्यान परेशला जामीन मंजूर व्हावा यासाठी त्याचे वकील आग्रही होते तर दुसऱ्या बाजूने सरकारी वकिलाने परेशच्या कोठडीसाठी आग्रह धरला नाही तो नाहीच, शिवाय त्याची कोठडी नको असल्याचेही न्यायालयात सांगून टाकले. यामुळे परेशच्या जामीन अर्जावर निवाडा सुनावणी न्यायालयाला सोपे झाले.मर्सीडीस परेशच चालवित होतादरम्यान अपघात झाला तेव्हा मर्सिडीस कार परेशच चालवित होता असा कबुली जवाब परेशची पत्नी मेघना सिनाय सावर्डेकर यांनी फोंडा प्रथमवर्ग न्यायालयाला सीआरपीसी १६४ अंतर्गत दिली आहे. म्हणजेच पतीच्या गुन्ह्याला पत्नीच साक्षिदार असे तूर्त म्हणता येईल. पोलिसांच्या तपासातही परेशच चालक असल्याचा निष्कर्श काढण्यात आला आहे.

 

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय